पिंपरी : वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने सांगवी परिसरात ‘रोजगार दो’ या अभियानाला सुरुवात करण्यात आली. युवा वर्गाने ‘रोजगार दो’ मागणीसाठी 7998799854 या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘रोजगार दो’ अभियानाचा प्रारंभ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हस्ते जुनी सांगवीतील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला.
तरुणांच्या हाताला काम देण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारमुळे बेरोजगारी वाढत चालली आहे. अनेक युवकांना नोकरी मिळत नाही आणि ज्यांच्या हाताला काम आहे, ते किती दिवस टिकेल याची शाश्वती नाही. आजघडीला अनेकांना रोजगार, नोकरी गमवावी लागली आहे. यामुळे सरकारचे डोळे उघडण्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जनतेमध्ये जाऊन जनतेशी बेरोजगारीबाबत संवाद साधत आहेत. या अभियानाला प्रतिक्रिया आणि मिस कॉल देऊन प्रतिसाद दिला.
तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयूर जयस्वाल यांच्या उपस्थितीत तहसिलदार गीता गायकवाड यांना वाढत्या बेरोजगारीबाबत निवेदन दिले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे निरीक्षक अक्षय जैन, पिंपरी-चिंचवड शहर सेवा दलाचे अध्यक्ष मकरध्वज यादव, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस कुंदन कसबे, सोशल मीडिया यु़वक काँग्रेसचे, तुषार पाटील, विशाल कसबे, रोहित शेळके, गणेश मानकर, नरेंद्र कसबे, सनी कसबे, राजू खुडे, राम भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते







Leave a Review