टाटा स्काय दर्शनवर नोव्हेना आणि ऑक्टेव्ह फीस्ट मास लाईव्हची मोफत सेवा उपलब्ध

Share this Newz

टाटा स्कायच्या सबस्क्राईबर्ससाठी मोफत सेवा

इंग्रजी, कोकणी, मराठी, तमिळ, मल्याळम आणि गुजराती या भाषांमध्ये प्रार्थना उपलब्ध

पुणे :  बांद्र्याच्या पवित्र वर्जिन मेरीच्या जन्माचा सोहळा दरवर्षी अवर लेडी ऑफ द माऊंट चर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या १७ दिवस चालणाऱ्या सोहळ्यात लाखो भाविक प्रार्थनेसाठी एकत्र येत असतात. खरंतर या सोहळ्यातील मुख्य आकर्षण असतं बांद्र्याची जत्रा म्हणजेच प्रसिद्ध बँड्रा फेअर. मदर मेरीच्या जन्मानिमित्त प्रचंड उत्साहात ही जत्रा पार पडते. मात्र, गेल्या २०० वर्षांत पहिल्यांदाच कोविड -१९च्या जागितक संकटाच्या बंधनांमुळे ही वार्षिक जत्रा पार पडणार नाही.

बहुविध स्टॉल्स आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी यंदाची जत्रा रंगणार नसली तरी बॅसिलिकाने यंदा डिजिटल मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. २० सप्टेंबरपर्यंत टाटा स्काय दर्शनवर प्रेक्षकांना नोव्हेना आणि ऑक्टेव्ह  फीस्टच्या प्रार्थनेचा लाभ घेता यावा, यासाठी या प्रार्थना लाईव्ह दाखवल्या जातील. टाटा स्कायच्या या महत्त्वाच्या उपक्रमामुळे भाविकांना त्यांचा सणाचा उत्साह कायम ठेवत घरूनच सुरक्षितरित्या प्रार्थना करता येईल.

नोव्हेना मास लाईव्ह टेलिकास्ट। १२ सप्टेंबरपर्यंत | सकाळी ७:४५ – ९:१५

ऑक्टेव्ह मास लाईव्ह टेलिकास्ट। १३ ते २० सप्टेंबर | सकाळी ७:४५ – ११:३०

फीस्ट ऑफ अवर लेडी (बँड्रा फीस्ट)।    १३ सप्टेंबर | सकाळी ७:४५ – ११:३०

या पवित्र काळात प्रार्थनेला उपस्थित राहण्याची परंपरा कायम रहावी यासाठी चर्च प्रशासनाकडे हजारोंच्या संख्येने विनंत्या आल्या होत्या. यासाठी कुटुंबासहित प्रार्थना करण्यासाठी, विशेषत: ज्येष्ठांची सोय पाहून सर्व प्रार्थना लाईव्ह टेलिकास्ट कराव्यात अशी विनंती भाविकांनी केली होती. त्यामुळे हा सोहळा टेलिकास्ट करण्यासाठी चर्चने टाटा स्कायशी संपर्क केला आणि त्यातून सबस्क्राईबर्ससाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दररोज प्रथम इंग्रजीत प्रार्थना होतील. त्यानंतर कोकणी, मराठी, तमिळ, मल्याळम आणि गुजराती अशा वेगवेगळ्या स्थानिक भाषांमध्ये प्रार्थना केल्या जातील. सबस्क्राईबर्सनी घरातूनच लाईव्ह फीड पाहण्यासाठी रीमोटवर Actve/Apps हे बटण दाबून त्यानंतर मेनूमध्ये टाटा स्काय दर्शन- फ्री> माऊंट मेरी बॅसिलिका, बांद्रा निवडून किंवा टाटा स्काय मोबाइल अॅपच्या माध्यमातून टाटा स्काय दर्शन या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Share this Newz