गुगलला पर्याय म्हणून ॲप्पल स्वत:चे सर्च इंजिन लाँच करण्याच्या तयारीत 

ॲप्पलकडून सर्च इंजिन आणल्यास गुगलला थेट आव्हान
Share this Newz

कॅलिफोर्निया : गुगल सर्च इंजिनला पर्याय म्हणून ॲप्पल आता स्वत:चे सर्च इंजिन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कोयवोल्फने दिलेल्या वृत्तामध्ये हा दावा करण्यात आला आहे. ॲप्पलकडून सर्च इंजिन आणले गेल्यास गुगलला थेट आव्हान मिळेल. कारण  ॲप्पलचे आधीपासूनच जगभरात मोठी ग्राहकसंख्या आहे.

याबाबत कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही. ॲप्पल हे सुरुवातीला स्वत:च्या डिव्हाइसमध्ये सुरू करणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग इंजिनिअर्सची भरती केली जात आहे.

ॲप्पलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी २३ जूनला वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये ॲप्पल आता सिलिकॉन चिप्सवर काम करणार असल्याच्या विधानाद्वारे याचे संकेत दिले होते. आयफोन, आयपॅड आणि मॅक ओएसमध्ये डिफॉल्ट सर्च इंजिन ठेवण्यासाठी गुगलकडून ॲप्पलला दरवर्षाला कोट्यवधी रुपये दिले जातात. वृत्तानुसार, हा करार लवकरच संपुष्टात येऊ शकतो. यूके कॉम्पिटिशन अँड मार्केट ॲथॉरिटी ॲप्पल व गुगलच्या सर्च इंजिन कराराबाबत कठोर भूमिका घेऊ शकते. वृत्तानुसार, ॲप्पलचे शेअर मार्केट जगात मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे गुगल सर्च डिफॉल्ट असल्याने दुसऱ्या सर्च इंजिनला संधी मिळत नाही, असे ॲथॉरिटीचे म्हणणे आहे. यासाठीच ॲप्पल स्वत:च्या सर्च इंजिनवर काम करत आहे. याहू आणि बिंगही सर्च इंजिनची सेवा देतात. मात्र, गुगलसमोर या दोन्ही कंपन्या अपयशी ठरल्या आहेत.

दरम्यान, कोयवोल्फच्या वृत्तानुसार सुरुवातीला ॲप्पल च्या सर्च इंजिनमध्ये फक्त नोकरी व स्पॉटलाइट सर्च करता येईल. सर्च इंजिन फोनमध्ये गुगल असिस्टंटप्रमाणे काम करेल. मात्र, तो पूर्णपणे प्रायव्हेट असेल. ते तुम्हाला आयओएस कॉन्टॅक्ट्स, डाॅक्युमेंट, ईमेल, इव्हेंट्स, फाइल, मेसेज, नोट आदींच्या आधारे प्राप्त होईल. वृत्तात दावा करण्यात आला आहे की, आयओएस १४ आणि आयपॅडओएस १४ बीटा व्हर्जनमध्ये कंपनीने गुगल सर्चला बायपास केले आहे. तसेच ॲप्पल बोटलादेखील नुकतेच अपडेट करण्यात आले. ॲप्पलबोट कंपनीचीच एक क्रॉलिंग साइट आहे.

 

Advertisement
Advertisement

Share this Newz