जेसीबी ग्रुपच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालकपदी दीपक शेट्टी

Share this Newz

नवी दिल्ली : जेसीबी ग्रुपने आज जेसीबी इंडिया लिमिटेडच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदावर दीपक शेट्टी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. ते गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून जेसीबीमध्ये नेतृत्वाच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. भारत व दक्षिण आशिया विभागासाठी विक्री, मार्केटिंग, उत्पादन सहाय्य आणि व्यवसाय विकास आदी विभागांचे कार्यकारी उपाध्यक्ष या भूमिकेतून त्यांनी हे स्थित्यंतर केले आहे. या पदाची जबाबदारी त्यांच्यावर दोन वर्षे होती. त्यापूर्वी ४ वर्षे ते यूकेमध्ये जेसीबीच्या जागतिक एक्सकॅव्हेटर व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक होते.

पुढील वर्षी सुबीर कुमार चौधरी यांच्याकडून दीपक शेट्टी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतील. चौधरी यांनी जेसीबी इंडियासोबत सुमारे १५ वर्षे काम केल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली आहे. जेसीबी इंडियाच्या एका कारखान्यापासून पाच कारखान्यांच्या वाढीच्या प्रवासात सुबीर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

दीपक शेट्टी यांच्या नियुक्तीविषयी जेसीबी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रॅमे मॅकडोनाल्ड म्हणाले, आमच्या समूहासाठी भारत ही महत्त्वपूर्ण बाजारपेठ राहिली आहे. आमच्या वारसा नियोजनाचा (सक्सेशन प्लानिंग) भाग म्हणून दीपक यांची या आव्हानात्मक भूमिकेसाठी नियुक्ती करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. भारत आणि यूकेमध्ये त्यांनी निभावलेल्या अनेक भूमिकांतून त्यांना मिळालेला अनुभव जेसीबी इंडियाला भारतातील बांधकाम उपकरण बाजारपेठेत अधिक भक्कम व शाश्वत स्थान प्राप्त करण्यास मदत करेल.

जेसीबी इंडिया बाबत: जेसीबी इंडिया लिमिटेड ही भारतातील अर्थमूव्हिंग व बांधकाम उपकरणाची आघाडीची उत्‍पादक कंपनी आहे. १९७९ मध्‍ये कंपनी एक संयुक्‍त उद्यम म्‍हणून सुरू झाली आणि आता युनायटेड किंग्‍डममधील जे सी बॅम्‍फोर्ड एक्‍सकेव्‍हेटर्सची पूर्णत: मालकीची उपकंपनी आहे. भारतात दिल्‍ली-एनसीआर, पुणे व जयपूर येथे पाच अत्‍याधुनिक कारखाने असलेली कंपनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला आत्‍मसात करते. कंपनीच्‍या जयपूर येथील कारखान्‍यामध्‍ये लैंगिक समानतेला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. कारखान्‍यामध्‍ये कार्यरत असलेल्‍या कर्मचा-यांमध्‍ये ३० टक्‍क्‍यांहून अधिक महिला कर्मचारी आहेत.

कंपनी आज ८ उत्‍पादन केंद्रांमध्‍ये ६० हून अधिक उत्‍पादनांची निर्मिती करते. या मेड इन इंडिया उत्‍पादनांची स्‍थानिक बाजारपेठांमध्‍ये विक्री होते, शिवाय ही उत्‍पादने ११० हून अधिक देशांना निर्यात केली जात आहेत. युकेबाहेर पुण्‍यामध्‍ये कंपनीचे सर्वात मोठे डिझाइन सेंटर आहे. या केंद्रामध्‍ये भविष्‍यासाठी आकर्षक नवीन तंत्रज्ञाने विकसित केली जातात.

जेसीबी लाइव्‍हलिंकच्‍या सादरीकरणाच्‍या माध्‍यमातून उद्योगक्षेत्रातील डिजिटल अॅण्‍ड अ‍ॅडवान्‍स टेलिमॅटिक्‍स क्षेत्रामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. लाइव्‍हलिंक रिअल-टाइम अलर्टस् व उपकरण देखरेखीच्‍या माध्‍यमातून सर्वोत्तम वर्क-साइट व्‍यवस्‍थापनासाठी आयओटी व बिग डेटाचा उपयोग करते.

जेसीबीचे भारतीय बांधकाम उपकरण उद्योगामध्‍ये सर्वात मोठे डिलर नेटवर्क आहे. तसेच भारतभरात जागतिक दर्जाच्‍या उत्‍पादन पुरवठ्यासाठी ६० हून अधिक डिलर्स आणि ७०० आऊटलेट्स आहेत.


Share this Newz