ग्राहकांनो सावधान : जिओमार्टच्या नावे बनावट वेबसाईट द्वारे फसवणूक

जिओमार्टची फ्रेंचायझी देण्याच्या नावाखाली फसवणूक
Share this Newz

मुंबई : रिलायन्सने रिटेलने आपल्या जिओमार्ट (Jiomart) सेवेची सुरूवात केली आहे. परंतु आता जिओमार्टची फ्रेंचायझी देण्याच्या नावाखाली फसवणूक सुरू असल्याचे प्रकार समोर आले आहेत. https://www.jiomart.com/ ही कंपनीची अधिकृत वेवसाईट असल्याची माहिती रिलायन्स रिटेलने सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना दिली आहे.

याबाबत माहिती देताना रिलायन्स रिटेलने म्हटले आहे, की जिओमार्टच्या नावे बनावट वेबसाईट्स सुरू करण्यात आल्या असून, या द्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे.

आम्ही सद्यस्थितीत कोणतीही डिलरशिप किंवा फ्रेंचायझी मॉडेल सुरू केलेले नाही. तसेच आम्ही कोणत्याही डिलर किंवा फ्रेंचायझीसाठी कोणत्याही एजंटलाही नियुक्त केलेले नाही. याव्यतिरिक्त आम्ही कोणत्याही प्रकारचे पैसेदेखील घेत नाही, असे रिलायन्स रिटेलने आपल्या जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

https://www.jiomart.com/ ही कंपनीची अधिकृत वेवसाईट असल्याचं रिलायन्स रिटेलने म्हटले आहे. काही अन्य वेबसाईट्स जिओमार्टच्या नावे ग्राहकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.

त्या वेबसाईट्स खालीलप्रमाणे…

1. jmartfranchise.in
2. jiodealership.com
3. jiomartfranchises.com
4. jiomartshop.info
5. jiomartreliance.com
6. jiomartfranchiseonline.com
7. jiomartsfranchises.online
8. jiomart-franchise.com
9. jiomartindia.in.net
10. jiomartfranchise.co

फसवणूक करणाऱ्यां विरोधात कारवाई करणार

अशा प्रकारच्या कोणत्याही लोकांसोबत व्यवहार केल्यास कंपनी जबाबदार राहणार नसल्याचंही रिलायन्स रिटेलनं म्हटलं आहे. तसंच कंपनीची प्रतीमा, ट्रेडमार्क आणि नावाचा चुकीचा वापर होत असल्यास अशा लोकांविरोधात कारवाई करण्यात येईल, असेही कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Advertisement

Share this Newz