मुंबई : सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली, तरी लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर येत्या काळात व्याजदरात आणखी कपात केली जाऊ शकते. RBIने गेल्या दोन पतधोरणात व्याजदरात १.१५ टक्के इतकी कपात केली आहे. सध्या रेपो दर चार टक्के आहे तर रिव्हर्स रेपो ३.३५ टक्के इतका आहे. तर Marginal Standing Facility चा दर ४.२५ इतका आहे.
एका कार्यक्रमात बोलताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, कोणत्याही पद्धतीने असे मानू नये, की आरबीआय उपाययोजना लवकर मागे घेईल. अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकट करून मार्गावर आणण्यासाठी सावधानता बाळगून पुढे जावे लागणार आहे.
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी सावधानता बाळगून पुढे जावे लागणार आहे. याबरोबरच आर्थिक क्षेत्रालाही आता सामान्य स्थितीत यावे लागेल, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. ते म्हणाले, की रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपययोजना लवकरच हटवल्या जातील असे कोणीही समजू नये, असही त्यांनी स्पष्ट केलेे. बँकिंग क्षेत्र सध्या उत्तम स्थितीत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलिनिकरण एक योग्य दिशेत उचलण्यात आलेले पाऊल आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकट करत मार्गावर आणण्यासाठी दक्षताही बाळगतकच महत्त्वाचेही त्यांनी सांगितले.
बँकांना सद्यस्थितीत आव्हानांचा सामना करावा लागेल हे स्पष्ट आहे. परंतु बँका या आव्हांनांना कसा प्रतिसाद आणि तोंड देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. देशातील करोना महामारीचा प्रकोप आणि त्याच्या अन्य बाबींवर स्पष्टता आल्यानंतर रिझर्व्ह बँक महागाई आणि आर्थिक वद्धीबाबत आपला अंदाज वर्तवणार आहे, असेही दास यांनी स्पष्ट केले. कर्ज देण्यात गरजेपेक्षा अधिक सतर्कता बाळगण्याने बँकांनाच अधिक नुकसान होणार आहे आणि मूलभूत कामे न केल्याने बँकाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. जोखीम पत्करण्यापासून बचाव करण्याऐवजी बँकांनी आपल्या रिक्स मॅनेजमेंट आणि गव्हर्नंन्स फ्रेमवर्कला अधिक सक्षम केले पाहिजे, असेही दास म्हणाले.








Leave a Review