पुणे : मेक इन इंडिया या उद्देशाला बळकटी देत टाटा स्काय (Tata sky) ने सेट टॉप बॉक्स सोर्सिंगमधील लक्षणीय वाटा भारतातूनच मिळवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने भारतीय बाजारपेठेसाठी सेट – टॉप बॉक्स बनवण्यासंदर्भात टेक्निकलरशी भागीदारी केली आहे. हे सेट-टॉप बॉक्स भारतातच तयार करून इथेच वितरित केले जाणार आहेत.
याबाबत टाटा स्कायचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हरित नागपाल यांनी सांगितले, की कोविड-१९ च्या संकटामुळे झालेल्या परिणामांशी आणि वेगाने झालेल्या बदलांशी जग जुळवून घेत असताना टाटा स्काय आणि टेक्निकलर कनेक्टेड होम यांनी २०२१ च्या सुरुवातीपर्यंत काही सेट-टॉप बॉक्सेस (एसटीबीज)चे उत्पादन इथे सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या मते, उत्पादन आणि पुरवठा साखळी कार्यचलनातील या बदलामुळे भारतातील ग्राहकांसाठी एसटीबीजचे उत्पादन करणे आणि ते वितरित करण्याची प्रक्रिया अधिक सुरळित होईल.
सेट-टॉप बॉक्सचे उत्पादन भारतात करण्यासाठी टाटा स्कायसोबत काम केल्याने या महत्त्वाच्या बाजारपेठेत अधिक चांगली सेवा देता येईल. ग्राहकांना विविध पर्याय देत असल्याने आमची पुरवठा साखळी क्षमता नेहमीच धोरणात्मकरित्या महत्त्वाची ठरली आहे. जगभरात पुरवल्या जाणाऱ्या सेवांचा कमी खर्च आणि त्यातील धोके कमी करण्यासाठी आम्ही बांधिल आहोत, असे टेक्निकलर कनेक्टेड होमचे अध्यक्ष लुईस मार्टिनेझ-अमागो म्हणाले.












Leave a Review