Jio चे नवीन वायफाय राउटर देणार Airtel ला टक्कर; जाणून घ्या किंमत

Share this Newz

नवी दिल्लीः

रिलायन्स जिओने एअरटेलला टक्कर देण्यासाठी WiFi राउटर सादर केले आहे. कंपनीने आपल्या ‘फायबर टू द होम सर्विस’साठी हे राउटर लाँच केले आहे.

        जिओ फायबर वेबलाइटने दिलेल्या माहितीनुसार, हे राउटर जिओ होम गेट वे (Jio Home Gateway) च्या माध्यमातून घरापासून एका फ्लोअरपर्यंत १००० स्क्वेयर फीट एरिया सहज कव्हर करू शकणार आहे. जिओ फायबरच्या या मेश राउटरची किंमत २४९९ रुपये आहे. ज्यांना वाय फाय कव्हरेज जास्त हवे आहे, अशा युजर्संसाठी हे राउटर लाँच केले आहे.

जिओने हे राउटर एअरटेलला टक्कर देण्यासाठी आणले आहे. एअरटेलने नुकतेच आपले Airtel Fiber Plus Mesh प्लान लॉन्च केला असून, २५ हजार रुपयांच्या किंमतीत वर्षभराची वैधता असणार आहे.


Share this Newz