नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ या करविषयक मध्यवर्ती संस्थेने (सीबीडीटी) १ एप्रिलपासून करदात्यांना रिफंड देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत प्राप्तिकर विभागाने करदात्यांना ८८ हजार ६५२ कोटी रुपये रिफंड दिला आहे. याचा लाभ २४.६४ लाख करदात्यांना झाला आहे. या रिफंडमध्ये वैयक्तिक करदात्यांची संख्या २३.०५ कोटी असून त्यांना एकूण २८हजार १८० कोटी रुपये रिफंड देण्यात आला आहे
करोना आणि लाॅकडाउनच्या पार्श्वभूमीवरअर्थ मंत्रालयाने वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) आणि कस्टमच्या करदात्यांचा कर परतावा तातडीने देण्याचे आदेश दिले होते. यामुळे एक लाख व्यावसायिक आणि सुक्ष्म, लघु, मध्यम (एमएसएमई) दिलासा मिळणार आहे. वैयक्तिक करदाते आणि व्यावसायिकांना एकूण १८ हजार कोटींचा कर परतावा दिला जाणार होता.
यामध्ये २३,०५,७२६ वैयक्तिक करदाते व १,५८,२८० कॉर्पोरेट करदाते यांना रिफंड देण्यात आला आहे. वैयक्तिक करदात्यांना ६० हजार ४७२ कोटी रुपये रिफंड मिळाला आहे.
करदात्यांना जाणून घेता येणार आयकर परताव्याची ताजी स्थिती
प्राप्तिकर ई-फाइलिंग पोर्टल किंवा ‘एनएसडीएल’च्या संकेतस्थळावर करदात्यांना पॅन क्रमांक आणि मूल्यांकन वर्ष भरून माहिती मिळवता येईल. देशात करोना व्हायरसचा प्रभाव वाढत आहे. या संकटकाळात केंद्र सरकारने कर परतावे तातडीने देऊन सामान्य करदाते आणि व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सुमारे १४ लाख करदात्यांना फायदा होणार आहे.







Leave a Review