NEET 2020 परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण परीक्षा प्रक्रिया असेल टच फ्री
Share this Newz

नवी दिल्ली : येत्या सप्टेंबरमध्ये घेण्यात येत असलेल्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) यूजी 2020 साठी नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) ने मार्गदर्शक सूचना जारी आहेत. सोशल डेस्टेंसिंगचे पालन करीत 15 लाख परिक्षार्थींचे नियोजन केले जाणार आहे.

संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण परीक्षा प्रक्रिया टच फ्री असेल. परीक्षा केंद्रात एकाच वेळी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांना रिपोर्टिंगसाठी टाइम स्लॉट देण्यात येणार आहेत. तसेच सर्व कर्मचारी सदस्य आणि उमेदवारांचे तापमान देखील तपासले जाईल. यावेळी जर एखाद्याला कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसली, तर त्यांना एका स्वतंत्र खोलीत ठेवले जाईल.

परिक्षार्थींची तापमान तपासणी होईल दोनदा 

परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर एका विद्यार्थ्याला सोडल्यानंतर दुसर्‍या विद्यार्थ्याला बोलावण्यात येईल. याशिवाय इतर कागदपत्रांची तपासणी केली जाईल. यामध्ये अ‍ॅडमिट कार्ड, सरकारी फोटो ओळखपत्र  दाखवावे लागेल. या संपूर्ण प्रक्रियेस 15 ते 20 मिनिटे लागतील. यावेळी उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांना स्पर्श केला जाणार नाही. यानंतर विद्यार्थ्याचे तापमान पुन्हा तपासले जाईल. त्याच वेळी तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना खोलीचा क्रमांक आणि आसन क्रमांक सांगितला जाईल.

सामाजिक अंतर लक्षात घेता, परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये इनविजीलेटर फिरू शकणार नाही. ते दूरवर बसून नजर ठेवतील. याशिवाय वर्गातील केवळ 50 टक्के विद्यार्थी हजर असतील. ड्यूटीदरम्यान इनविजीलेटर किंवा टीचरची कोणत्याही प्रकारे मदत घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना हात सॅनिटाइज करुन सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे लागणार आहे.

-विद्यार्थ्यांनी ठेवावे या गोष्टींकडे लक्ष-

  • तोंडावर मास्क आणि हातमोजे घालावे लागतील
  • पारदर्शी बॉटलमध्ये पिण्याचे पाणी आणता येईल.
  • चिटींग थांबवण्यासाठी मेटल डिटेक्टरने विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल.
  • 50 एमएलची पारदर्शी हँड सॅनिटायजरची बॉटल आणण्याची परवानगी असेल.
  • कोणत्याही प्रकारचे मेटलल इत्यादींनी बनवलेले प्रोडक्ट सोबत आणू नका.
  • मेटल डिटेक्टरने डायरेक्ट संपर्क न येताच केली जाईल तपासणी.
  • परीक्षेपूर्वी संबंदित दस्तावेज अॅडमिट कार्ड, सरकारी फोटो ओळखपत्र सोबत ठेवा.
  • शौचालयात जाण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक असेल.
  • हॉलमध्ये फिरणार नाही शिक्षक.

-परीक्षा हॉलमध्ये असेल ही व्यवस्था-

  • परीक्षा केंद्राच्या भिंती, टेबल-खुर्ची, कॉम्यूटर, पंखे हे सर्व परीक्षा सुरू होण्यापूर्वी सॅनिटाइज केले जाईल.
  • कॉरिडोरमध्ये रुम नंबर मोठ्या अक्षरात लिहिले जातील. यामुळे विद्यार्थ्यांना वर्ग शोधताना त्रास होणार नाही.
  • परीक्षेदरम्यान पहिल्यांदाच लाउडस्पीकरचा वापर केला जाईल, या माध्यमातून विद्यार्थ्यांना दुरूनच माहिती दिली जाऊ शकेल.
  • परीक्षा केंद्रात ब्लूटूथ, वाय-फायची तपासणी होईल, यानंतर एनटीए जॅमरचा प्रयोग करेल.
Advertisement
                              Advertisement

Share this Newz