लिओनेल मेस्सी सोडणार बार्सेलोना क्लब

Share this Newz

लिस्बन :

गेल्या आठवड्यात चॅम्पिअन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बायर्न म्युनिचकडून 2-8 असा पराभव पत्करावा लागल्यानंतर लिओनेल मेस्सी बार्सेलोना क्लब सोडणार असल्याचे वृत्त स्पॅनिश वृत्तपत्रांनी दिले आहे.

पराभवानंतर संघ व्यवस्थापनाबाबत मेस्सीने नाराजी व्यक्त केली होती. तसेच, क्लब तातडने सोडण्याचे संकेतही त्याने दिले आहेत.

मेस्सीचा करार पुढील वर्षी संपणार आहे. मात्र, संघाला विजयाच्या मार्गावर आणण्यासाठी आवश्यक तत्परता व्यवस्थापनामध्ये नसल्याने मेस्सी क्लब सोडण्याच्या तयारीत आहे. मँचेस्टर सिटी क्लब मेस्सीला करारबद्ध करण्यासाठी आघाडीवर आहे. मेस्सीने याच वर्षी क्लबचे संचालक एरिक अ‍ॅबिड्ल यांच्यावर टीका केली होती. तसेच, संघातील खेळाडू सराव करत नसल्याची तक्रारही त्याने केली होती.


Share this Newz