अमेरिकेतील भारतीयांना मोठा दिलासा; एच १ बी व्हिसावरील निर्बंध शिथिल अमेरिकेतील

Share this Newz

अमेरिकेतील भारतीयांना मोठा दिलासा

वॉशिंग्टन, ऑनलाईन 

अमेरिकेने एच१ बी आणि एल १ व्हिसा संदर्भात काही निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे अमेरिकेत काम करत असलेल्या आयटी आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रम्प प्रशासनाने याबाबतची घोषणा केली आहे.

अमेरिकेने एच१ बी व्हिसावर निर्बंध घातल्याने त्याचा फटका हजारो भारतीयांना बसला होता. पण आता या व्हिसावरील निर्बंध शिथिल केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच १ बी व्हिसा नियमांत बदल केले आहेत. ज्या लोकांकडे एच १ बी व्हिसा आहे, त्यांना सशर्त अमेरिकेत येण्याची परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकेवर एच १ बी व्हिसावर राहणार्‍या लोकांच्यात भारतीयांचं प्रमाण सर्वांधिक आहे.

       एच १ बी या व्हिसाच्या आधारावर दुसर्‍या देशातल्या नागरिकांना अमेरिकेत जास्तीत जास्त ६ वर्षं राहून नोकरी करता येते. या व्हिसामुळे अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग सोपा होतो. कारण हा व्हिसा मिळाल्यानंतर ५ वर्षांनी परदेशी नागरिकाला सरळ अमेरिकेच्या ग्रीन कार्डसाठी अर्ज करता येतो. अमेरिकेत या व्हिसाची मागणी इतकी जास्त आहे की, दरवर्षी लॉटरी तिकिटाप्रमाणे हा व्हिसा कुणाला द्यायचा याची यादी जाहीर केली जाते.


Share this Newz