The Newz Biz Team, PUNE विविध बँकांचे तंत्रज्ञान भागीदार असणाऱ्या ...
The Newz Biz Team, PUNE NPST the Technology Service Provider ...
The Newz Biz Team, PUNE Pune realty major Saarrthi Group ...
The Newz Biz Team, PUNE Bringing to an enda high-octaneand ...
The Newz Biz Team, PUNE भारतातील आघाडीचे शॉर्ट व्हिडीओ कंटेंट ...
The Newz Biz Team, PUNE पुणे रियल्टीचा प्रमुख सारथी ग्रुप ...
The Newz Biz Team, MUMBAI Peter England, a leading international ...
The Newz Biz Team, PUNE अपोलो टायर्स आणि अशोक लेलँड ...
The Newz Biz Team, PUNE Apollo Tyres and Ashok Leyland ...
The Newz Biz Team, PUNE इमारत बांधणी क्षेत्रातल्या आघाडीच्या अपर्णा एन्टरप्राईझेस लिमिटेड कंपनीने पुढील चार वर्षांत अॅल्युमिनियम खिडक्या, दरवाजे यंत्रणा अल्तेझा ब्रँडची उभारणी करण्यासाठी १०० कोटींची गुंतवणूक करण्याची योजना असल्याचे आज जाहीर केले. या गुंतवणुकीचा उपयोग उत्पादन पोर्टफोलिओला आणि त्याचबरोबर उत्पादन सुविधेला, विपणन आणि रिटेलिंगला बळकटी आणण्यासाठी करण्यात येईल. यावेळी त्यांनी अगदी अलिकडे तयार केलेली स्लिम अॅल्युमिनियम स्लायडिंग डोअर यंत्रणा– एसीए एम–१९ सिरीज पण सादर केली. ही यंत्रणा अगदी अरुंद साईटलाईन्स मध्येही कार्यरत राहणार असून अल्तेझातर्फे आपल्या ग्राहकांसाठी सादर करण्यात आलेली ही सर्वाधिक बारीक अॅल्युमिनियम स्लायडिंग डोअर यंत्रणा आहे. ही आगळीवेगळी यंत्रणा मिनीमॅलिस्टीक (किमान चौकट प्रबंधक) रचनेवर आधारित असून त्यामध्ये १९ मिलीमीटरचा पातळ अॅल्युमिनियम प्रोफाईल इंटरलॉक सकट संपूर्ण दरवाजाभर असेल. ही यंत्रणा कॉर्नर ओपनिंग्जनाही (कोपऱ्यात उघडणाऱ्या) लागू होऊ शकणार आहे. अल्तेझा बद्दलच्या योजनांबद्दल बोलताना अपर्णा एन्टरप्राईझेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री.अश्विन रेड्डी म्हणाले, भारतातली अॅल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजे यंत्रणा बाजारपेठ २०००० कोटी रुपयांना बंद होऊन ७.९% दराने वाढत आहे. चांगल्या गुणवत्तेची उत्पादने आणि सेवा यांना मागणी मोठी आहे आणि आम्ही ही मागणी पूर्ण करण्यासाठी तयार आहोत. १०० कोटींपैकी ६० टक्के निधी हा उत्पादन प्रक्रियेला बळकटी आणण्यासाठी वापरण्यात येईल. उर्वरित निधी संशोधन आणि विकास कार्य तसेच आमच्या डीलरशीपचे जाळे मजबूत करण्यासाठी वापरला जाईल. या विकासाकडे नजर ठेऊन आम्ही आमची टीम मजबूत करण्याची योजनाही आखत आहोत. २०२१ च्या अखेरीपर्यंत १०० हून अधिक लोकांची नेमणूक आम्ही करणार असून त्यातले बहुतांश जण तेलंगणा मधील असतील. २०२५ पर्यंत अल्तेझा संघटीत अॅल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजे बाजारपेठेत ८–१०% प्रभुत्व मिळवेल अशी आम्हांला आशा आहे. ...













