मेड ऑन रोपोसो या राष्ट्रीय पातळीवरील टॅलेंट हंटमध्ये विजेत्यांची नावे घोषित

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

भारतातील आघाडीचे शॉर्ट व्हिडीओ कंटेंट क्रीएटर्स शोधण्यासाठीच्या मजेशीर, प्रचंड लोकप्रिय अशा स्पर्धेची सांगता करत रोपोसोने सादर केलेल्या मेड ऑन रोपोसो या राष्ट्रीय पातळीवरील टॅलेंट हंटमध्ये विजेत्यांची नावे घोषित केली गेली. पाच विभागांमध्ये अंतिम फेरीतील १८ स्पर्धक आणि २ वाईल्ड कार्ड एंट्रीजच्या स्पर्धकांमुळे अत्यंत चुरशीची स्पर्धा झाली. व्हर्च्युअली पार पडलेल्या या स्पर्धेत देशाच्या विविध भागातील स्पर्धकांनी आपापल्या घरातूनच भाग घेतला. या शोचे जजेस आणि मेंटॉर्स – बॉलिवुड अभिनेत्री नेहा धुपिया, ख्यातनाम कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान आणि आघाडीचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा अंतिम फेरीसाठी उपस्थित होते. मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ कानन यांनी केले.

प्रत्येक विभागातील अंतिम विजेत्याला प्रत्येकी एक लाख रोख बक्षीस तसेच तीनही सेलिब्रिटी जजेससोबत कंटेंट क्रीएशनची सूवर्णसंधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे विशाखा पांडे हिला तिच्या बनारस या मूळ शहरातील वैशिष्ट्ये दाखवणाऱ्या व्हिडीओसाठी मुकेश छाब्रा यांच्यासोबत त्यांच्या मुंबईतील कास्टिंग स्कूलमध्ये खास इंटर्नशीप करण्याची संधी मिळाली आहे. तर रोशन मिश्रा या विजेत्याला चम चम हे भारतीय मिष्टान्न बनवणे आणि त्यातच अप्रतिम नृत्य कौशल्यांच्या व्हिडीओसाठी प्रीमियम ब्रँडची एसयूव्ही भेट मिळाली आहे.

फिक्की-ईवाय रीपोर्ट २०२१ नुसार शॉर्ट फॉरमॅट व्हिडीओ प्लॅटफॉर्म अॅप्सवरील वापरकर्त्यांमध्ये मागील दोन वर्षांत ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भविष्यात यात आणखी वाढ होईल असे आम्हाला वाटते आणि शॉर्ट व्हिडीओ व्यासपीठांवरील अगणित शक्यतांचा आम्ही वेध घेणार आहोत,  असे रोपोसोच्या जीएम मानसी जैन म्हणाल्या.

बॉलिवुड अभिनेत्री आणि परीक्षक नेहा धुपिया म्हणाल्या, या स्पर्धेतील स्पर्धक आणि विजेत्यांनी ग्लान्स रोपोसो व्यासपीठाची ताकद आपल्यातील अनोखी प्रतिभा जोखण्यासाठी आणि अतुलनीय गुंतवून ठेवणारा कंटेंट निर्माण करण्यासाठी वापरली. इतक्या प्रतिभावान कंटेंट क्रीएटर्ससाठी मेंटॉर आणि परीक्षक बनणे हा माझा सन्मान आहे.


Share this Newz