The Newz Biz Team, PUNE
अपोलो टायर्स आणि अशोक लेलँड यांनी एकत्र येऊन ट्रकचालक समुदायासाठी सारथी ही कोविड हेल्पलाईन सुरू केली आहे. ट्रक चालक, हेल्पर्स आणि त्यांचे कुटुंबीय यांना डोळ्यासमोर ठेवून सुरु करण्यात आलेल्या या हेल्पलाईनच्या माध्यमातून कोविड विषयक मार्गदर्शन व सल्लामसलत, लसीकरणासाठी मार्गदर्शन आणि अन्य आजारांसाठी नॉन-कोविड मार्गदर्शन व सल्लामसलत यांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. देशव्यापी स्तरावर कार्यरत असणारी ही हेल्पलाईन सध्या – हिंदी, तमिळ, तेलुगु, मराठी आणि असामी या पाच भाषांत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. टेलेराड फाउंडेशन हे या हेल्पलाईन सेवेचे तांत्रिक भागीदार आहेत.
ट्रकचालक समुदायातील ज्या सदस्यांना या सेवेचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत ७०२८१ ०५३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
ट्रकचालक समुदायातील ज्या सदस्यांची चाचणी कोविड पॉझिटीव्ह आली असेल, आणि जे गृह विलगीकरणात असतील, त्यांना हेल्पलाईनवर डॉक्टरांशी सल्लामसलत करता येणार आहे. तसेच संसर्गाच्या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांना पोषण आहाराबाबत देखील मार्गदर्शन मिळू शकणार आहे. नॉन-कोविड रुग्णांना सारथी उपक्रमाच्या अंतर्गत डॉक्टरांशी सल्लामसलत आणि प्रिस्क्रिप्शन सेवा पुरविण्यात येणार आहे.
ट्रकचालक समुदायातील ज्या लाभधारकांना लसीकरणाबाबत मार्गदर्शन हवे असेल, त्यांना लसीबाबत सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी, आरोग्य सेतू पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी, नजीकच्या शासकीय रुग्णालयात अपॉइंटमेंट मिळवून देण्यासाठी, लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेण्यासाठी आणि गरज भासल्यास लसीकरणपश्चात वैद्यकीय सहायता मिळवून देण्यासाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि समुपदेशन पुरविले जाणार आहे.
वर्ष १९९४ पासून अशोक लेलँड आपल्या ड्रायव्हर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उत्तम आणि सुरक्षित ड्रायव्हिंगच्या सवयी बाबत वाहन चालकांच्या समुदायाला शिक्षित करण्याचे काम करत आहे. सध्या देशभरात अशा ११ ड्रायव्हर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कार्यरत असून स्थापनेपासून त्यामध्ये मिळून एकूण १४,८२,४६२ वाहन चालकांना विविध कार्यशाळांच्या माध्यमातून शिक्षित करण्यात आलेले आहे.







Leave a Review