प्रसिद्धीसाठी केलेल्या निषेधाचा युवक आघाडीकडून निषेध; प्रशांत शितोळे यांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्षाची युवा शक्ती

Share this Newz

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे सरकार यांनी राष्ट्रहिताच्या आणि देशप्रेमाच्या भूमिकेतून घेतलेल्या भूमिकेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी, पिंपरी चिंचवड शहर यांचा ठाम पाठिंबा आहे. त्यांच्या भूमिकेचा निषेध करण्याच्या नावाखाली करण्यात येणारे आरोप हे केवळ प्रसिद्धीसाठी केलेले राजकीय स्टंट आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या राजकारणाचा आम्ही तीव्र निषेध करतो.

नगरसेविका सुलभाताई उबाळे यांनी “यांना आत्ताच देशप्रेमाचा पुळका आला आहे” अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत खेदजनक आहे. ‘वंदे मातरम्’सारख्या राष्ट्रभावनेशी निगडित विषयाबाबत अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्यांची देशप्रेमाची लायकी काय आहे, हे सांगण्यासाठी कोणाला वेगळे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम हा कोणाच्या राजकीय सोयीचा विषय नसून, तो प्रत्येक भारतीयाच्या भावनेशी जोडलेला विषय आहे.

‘वंदे मातरम्’चा सन्मान करण्याची भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधीवरच प्रश्न उपस्थित करणे, त्यांच्या देशप्रेमावर संशय घेणे आणि त्याला राजकीय प्रसिद्धीचा विषय बनवणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. प्रशांत शितोळे सरकार यांनी घेतलेली भूमिका ही राष्ट्रभावनेचा सन्मान करणारी असून, त्यांच्या या भूमिकेला आम्ही पूर्णपणे समर्थन देतो.

प्रशांत शितोळे सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि स्वाभिमानाचा वारसा जपणारे नेतृत्व आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात येणाऱ्या वक्तव्यांना युवक आघाडी योग्य आणि लोकशाही मार्गाने उत्तर देईल.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक शक्ती प्रशांत शितोळे सरकार यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.

माझी वैयक्तिक भूमिका देखील स्पष्ट आहे—प्रशांत शितोळे सरकार यांच्या सकारात्मक, विकासाभिमुख आणि शहरहिताच्या भूमिकेला माझा नेहमीच ठाम पाठिंबा राहील. त्यांच्या सन्मानाला धक्का पोहोचविणारे अथवा विनाकारण बदनाम करण्याचे प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही.

पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी, नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि राष्ट्रहिताच्या प्रत्येक सकारात्मक भूमिकेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीची युवा शक्ती प्रशांत शितोळे सरकार यांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभी राहील.

– डॉ. धम्मरत्न गायकवाड, युवक शहराध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी, पिंपरी चिंचवड शहर


Share this Newz