पुणे, प्रतिनिधी : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे आणि अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट यांच्या संयुक्त विद्यमाने अजित स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेटी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील ६८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
“आपल्या महाविद्यालयात उपलब्ध असेलेले समृद्ध ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा जास्तीत जास्त वापर करून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करावी,” असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले.
या स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक हर्षदा दिलीप पिसाळ, द्वितीय क्रमांक अशोक रामलिंग पवार आणि तृतीय क्रमांक सोनाली पांडुरंग शेलार या विद्यार्थ्यांनी मिळवला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. अनिल लोंढे, डॉ. प्रवीण पोतदार, प्रा. सुरज काळे, प्रा. गौरव शेलार, प्रा. कर्डिले, डॉ. ज्योती धोत्रे, प्रा. महेश्वरी जाधव, प्रा. गौरी झुरंगे प्रा. मनिषा सुरवसे यांनी या परीक्षेचे नियोजन केले.








Leave a Review