युनिव्हर्सल लॉ कॉलेज, करंदी येथे वर्ग प्रतिनिधी निवडणूक बिनविरोध; स्वप्नील मलाव व कीर्ती कदम यांची निवड

Share this Newz

पुणे, दि. २२ जून : युनिव्हर्सल लॉ कॉलेज, करंदी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वर्ग प्रतिनिधी (Class Representative) निवडणूक अत्यंत उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये वर्ग प्रतिनिधी (CR) आणि महिला वर्ग प्रतिनिधी (Ladies Representative) या पदांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती.


मात्र, दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने स्वप्नील मलाव यांची वर्ग प्रतिनिधी (CR) म्हणून तर कीर्ती कदम यांची महिला वर्ग प्रतिनिधी (LR) म्हणून बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
ही निवड बिनविरोध होण्यासाठी पंकज गायकवाड आणि युवराज रायकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राचार्य मल्लिकार्जुन पुजारी यांनी कामकाज पाहिले, तर निरीक्षक म्हणून देवेंद्र कोळपकर उपस्थित होते. सूचक व अनुमोदक म्हणून अनुक्रमे प्रदीप आंधळे आणि कावेरी मुंगसे यांनी भूमिका बजावली.
निकाल जाहीर झाल्यानंतर माजी वर्ग प्रतिनिधी नितीन भुजबळ यांनी आभार मानले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस पाटील भानुदास पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
या प्रसंगी प्राचार्य मल्लिकार्जुन पुजारी यांनी नवनिर्वाचित प्रतिनिधींना शुभेच्छा देताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या विश्वासास पात्र ठरत त्यांनी शैक्षणिक, प्रशासकीय तसेच विविध उपक्रमांमध्ये जबाबदारीने कार्य करावे आणि महाविद्यालय व विद्यार्थी यांच्यात समन्वय साधावा.
नवनिर्वाचित प्रतिनिधी स्वप्नील मलाव व कीर्ती कदम यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.


Share this Newz