द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : पिंपळे गुरवमध्ये सालाबादप्रमाणे यंदाही शामभाऊ जगताप परिवाराच्या वतीने बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. रामकृष्ण मंगल कार्यालय चौक ते पिंपळे गुरव गावठाण दरम्यान बैलांची वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
बैलांना स्नान घालून, बाशिंग, फुगे, मणी-माळ, रंग यांनी सजवून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पिंपळे गुरवकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. बैलांचे जागोजागी पूजन करण्यात आले. मिरवणुकीत कदम, जांभुळकर, नवले, कवडे, काशिद देवकर, सांळुके, चव्हाण, जगताप परिवारासह राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघिरे, माजी नगरसेवक नवनाथ जगताप, शांताराम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तानाजी जवळकर, युवा नेते अमरसिंह आदियाल, युवा नेते धनंजय ढोरे, गणेश बँकेचे माजी अध्यक्ष संजय जगताप, किसन जगताप, हनुमंत जगताप, नरेश जगताप, दत्तात्रय जगताप, जनार्दन जगताप, रोहिदास जगताप, आदेश जगताप, दिग्विजय जगताप, अक्षय जगताप, सुमित जगताप, कमलेश जगताप, सिद्धू जगताप आदींच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.
याबाबत बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांनी सांगितले, की जगताप पाटील परिवाराची ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली असून, बैलांना सजवून गावातील वेशीतून मंदिरांमध्ये बैलांना ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर, म्हस्कोबा मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री मारुती मंदिर, श्री बापूजी बुवा मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर आदी मंदिरांसमोर बैल जोडीला देवदर्शनासाठी नेले जाते व गावातील ग्रामस्थ बैलाला औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य खायला देतात.
बैलाच्या मिरवणुकीसाठी प्रसिद्ध बँड लावून मिरवणूक काढण्यात येते. यावेळी पिंपळे गुरव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्यामध्ये कदम, काशिद, देवकर, नवले, जवळकर , गांगर्डे, जांभुळकर, साळुंके, पाटणे, चव्हाण, जाधव, कोतवाल, मोटे, डोळस व इतर सर्व ग्रामस्थांच्या वतीने बैलांचे पूजन करण्यात येते. जगताप परिवाराच्या घरातील सदस्य व शामभाऊ जगताप मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित असतो.










Leave a Review