द न्यूज बिझ टाईम्स, पुणे : “स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले जयंती महोत्सवा'(दि. १९ मार्च) निमित्त वेरुळ येथील भोसले कुटुंबियांच्या गढी परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विलास पांगारकर, स्वागताध्यक्षपदी आमदार प्रशांत बंब व हर्षवर्धन कराड, कार्याध्यक्षपदी राजेंद्र दाते यांची निवड करण्यात आल्याची माहिती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी दिली.
यंदाच्या जयंती महोत्सवानिमित्त रविवारी (१९ मार्च) सकाळी दहा वाजता वेरूळ येथील गढीच्या परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर संस्थानचे श्रीमंत मुधोजीराजे भोसले, राजे लखोजी जाधव (सिंदखेड) यांचे वंशज शिवाजीराजे जाधव उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री संदीपान भुमरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कराड, सहकारमंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार बंब, ज्येष्ठ उद्योगपती पद्माकर मुळे, साहित्यिक बाबा भांड, मुख्य अभियंता विजय घोगरे, रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. या निमित्त प्रा. प्रदीप सोळंके यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी ‘स्वराज्य संकल्पक शहाजीराजे’ या पुस्तकाचे प्रकाशन व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी (१७ मार्च) सायंकाळी वेरूळ येथील गढीवर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ चव्हाण यांनी वर्ष २०२३ ची नूतन कार्यकारीणी जाहीर केली असून यात अध्यक्ष विलास पांगारकर, स्वागताध्यक्ष आमदार प्रशांत बंब, हर्षवर्धन कराड कार्याध्यक्ष, तर जलअभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
Leave a Review