द न्यूज बिझ टाईम्स, पुणे : अखिल भारतीय छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने यंदा प्रथमच नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा खरा परिचय देश पातळीवर करून देण्याच्या उद्देशाने आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उत्सव समितीचे संस्थापक किशोर चव्हाण, छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी दिली.
रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला १३ मे रोजी सायंकाळी महाराष्ट्र सदनमध्ये दीपमहोत्सव साजरा केला जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती १४ मे रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र सदनमध्ये नागपूर संस्थानचे मुधोजीराव भोसले, शिवाजीराजे जाधवराव, राजे लखोजीराव जाधवराव, राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे १३ वे वंशज भूषणसिंह राजे होळकर, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रदीप साळुंके यांचे व्याख्यान होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज महोत्सव समिती कार्यकारिणी जाहीर :
महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विलास पांगारकर यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीत स्वागताध्यक्ष मराठा रामनारायण, राजसाहेब पाटील, कार्याध्यक्ष तानाजी हुस्सेकर, सचिवपदी रामभाऊ जाधव, सचिन गायकवाड, विक्कीराजे पाटील, उपाध्यक्षपदी गणेश लोखंडे, माधव आवरगंड, ज्ञानेश्वर ढोबळे, सरचिटणीसपदी शिवाजी ठोंबरे, संजय फटाकडे, प्रदीप बिल्लोरे, कोषाध्यक्षपदी अशोक खानापुरे यांची, तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रवीण माने, नाना कदम, राजू थेटे, अशोक वाघ, नितीन कदम, रवींद्र सोनवणे यांची, तर महिला प्रतिनिधी म्हणून ऍड. सुवर्ण मोहिते. प्रा. डॉ. मनीषा मराठे, सुवर्णा तुपे आदींचा समावेश आहे
Leave a Review