लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूड चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनात यशस्वी पदार्पण

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : चित्रपट दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख हे लेखन, दिग्दर्शन, गीतकार या पाठोपाठ आता बॉलिवूड चित्रपटात संगीत दिग्दर्शक रूपाने प्रेक्षकांसमोर येत आहेत. अल्ताफ शेख यांनी येत्या ३ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या हिंदी चित्रपट ‘लोरी’चे गीत लेखन केले असून, सुधीर कुमार हजेरी यांच्यासोबत संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. प्रसिध्द गायक सुरेश वाडकर, गायिका उर्मिला धनगर, गायक स्वप्निल बांदोडकर, गायिका प्रियांका बर्वे आणि गायिका अंजली गायकवाड यांनी या चित्रपटाची गाणी गायली आहेत.

दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘वेडा बी.एफ.’ सिनेमातील ‘हे माझे दुर्वेश बाबा’ या गाण्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन ‘लोरी’ या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली. ती त्यांनी सुधीर कुमार हजेरी यांच्यासोबत यशस्वीपणे पार पाडली आहे.

अल्ताफ शेख यांनी त्यांच्या अनोख्या लेखन शैलीतून याआधी चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यापैकी 2018 मध्ये रिलीज झालेल्या वेडा बी.एफ या हिंदू – मुस्लीम ऐक्यावर भाष्य करणार्‍या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला केला होता. वेडा बी.एफ चित्रपटाची नोंद वल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत.

दरम्यान, साई राम अ क्रिएटिव्ह वर्ल्ड’ची प्रस्तुती असलेल्या लोरी चित्रपटाचे निर्मिती अविनाश कवठणकर यांची असून, दिग्दर्शन राजू रेवणकर यांचे आहे. डीओपी कुमार डोंगरे, पणती पटेल, राजकुमार, अली शेख, शान कक्कर, रंजीत दास, अभिलाषा घैरा, प्रतिभा शिंपी, आरती शिंदे; तर आर्ट – राजू माळी, मेकअप- केतन, कॉस्ट्यूम- संगीता चौरे आणि आरती पाटील कुलकर्णी, लाईन प्रोड्यूसर- शाहजहां शेख, प्रोडक्शन मैनेजर- अमजदखान शेख, किरण घोडके, अभिषेक चौरे, हर्ष राजे, मेकअप – किरण सिद्दीद्दी यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
आहेत. हिंदी आणि मराठीतले अनेक कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत.


Share this Newz