द न्यूज बिज् टाईम्स, प्रतिनिधी :
आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभेच्या विकासासोबतच सांगवी पिंपळे गुरवचा मोठा विकास केला आहे. इतर उपनगरांपेक्षा सांगवी, पिंपळे गुरवचा विकास हा सरस दिसत आहे तो केवळ आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळेच. नागरिकांना मुबलक पिण्याचे पाणी, भव्य नऊ एकारातले मोठे उद्यान, प्रशस्त रस्ते, वीज, आरोग्याच्या सुविधा, चांगल्या शाळा अशा सुविधांनी परिपूर्ण असे आपल्या स्वप्नातले पिंपळे गुरव साकारले ते केवळ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रयत्नांमुळेच.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या जीवनात पिंपळे गुरव सोबतच पिंपरी चिंचवड शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून विकास केला. ते एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. प्रत्येकाला आपलेसे करून घेण्याची त्यांची एक वेगळी हातोटी होती. गोरगरीब कार्यकर्त्याला ताकद देऊन त्याला उच्च पदापर्यंत पोचविण्याचे मोठे काम त्यांनी केले. म्हणजेच गरिबांसाठी परिस्पर्श म्हणून लक्ष्मण जगताप यांनी कार्य केले. अनेक गरीब कार्यकर्त्याला राजकारणात येण्यासाठी संधी दिली. त्याला नगरसेवकपदी बसवले. तसेच त्याच्याकडून चांगले कामही करून घेतले. आमदार जगताप यांचे वडील पंचायत समिती सदस्य होते. त्यामुळे पहिल्यापासूनच घरात राजकीय वातावरण होते. हाच वारसा पुढे घेऊन त्यांनी राजकारणात सक्रियता दाखवायला सुरुवात केली. ते आजतागायत त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

अगदी पिंपरी चिंचवडचा विकास आराखडा राबविण्यात त्यांचे मोठं योगदान आहे. पिंपरी चिंचवड शहराचा पुढच्या पंचवीस ते तीस वर्षाचा विस्तार लक्षात घेऊन त्यांनी विकास आराखड्यामध्ये विविध गोष्टी नमूद केल्या. तसेच पिंपरी चिंचवड शहरासाठी वेगवेगळ्या योजना आणण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. स्मार्ट सिटी योजना ही पिंपरी चिंचवड शहरासाठी यावी. यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते.

1986 साली ते महापालिकेत गेले. त्यानंतर या परिसरातील विकास कामांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यापूर्वीचे पिंपळे गुरव म्हणजे अगदी व्यवस्थित रस्तेही नव्हते. चिखलमय रस्त्यातून वाट काढावी लागायची. या ठिकाणी यायलाही लोक घाबरत होते. असे येथील नागरिक सांगतात. आमदार जगताप यांनी ही परिस्थिती सुधारत या परिसराला सर्वात सुंदर परिसर बनविला. आजचा नाशिक फाटा पूल असेल, महापालिका भवन समोरील ग्रेट सेपरेटर असेल किंवा भोसरी वाकड बीआरटी रस्ता असेल या सगळ्यांचे श्रेय लक्ष्मण भाऊ जगताप यांना जातं. आज पिंपळे गुरव खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण आहे, परिपूर्ण आहे, ते केवळ लक्ष्मण जगताप यांच्यामुळेच.


याबरोबरच विद्यार्थी शिकले पाहिजेत, या दृष्टीने त्यांनी चांगल्या शिक्षण संस्था उभारण्यासाठी पुढाकार घेतला. महिलांच्या हाताला काम मिळावे, यासाठी प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम दिले. अनेक सहकारी संस्था उभारण्यासाठी पुढाकार घेतला. ज्याला राजकारणाची आवड आहे, त्याला राजकारणात आणि ज्याला व्यवसायाची आवड आहे त्याला व्यवसायात पुढे येण्यासाठी त्यांनी नेहमी सहकार्य केले. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी राजकारण केले. पण राजकारणात कधी त्यांनी जात धर्म आड येऊ दिला नाही.

२०१९ च्या निवडणुकीतील विजयानंतर त्यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते. तरीही त्यांनी कोरोना संकट काळात स्वतःपेक्षा नागरिकांना मदत करण्यात धन्यता मानली होती. कोरोना काळात त्यांनी गोरगरीब व गरजू नागरिकांना भरपूर मदत केली. उदरनिर्वाह असो की हॉस्पिटल असो त्यांनी नागरिकांना मदत करून माणुसकी जपली. गेल्या वर्षभरापासून त्यांचा सार्वजनिक जीवनातला वावर अतिशय कमी झाला होता. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथूनही ते नागरिकांची कामे करत होते. शहरविकासासाठी निगडीत प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार, महापालिका, जिल्हाधिकारी व इतर शासकीय कार्यालयासोबत सातत्याने पत्रव्यवहार करत होते.
Leave a Review