पुण्याच्या रोहन भंसाळीच्या प्रकल्पाची नासाच्या क्यूब इन स्पेस प्रोग्राममध्ये निवड

अंतराळात मानवी शरीरावरील किरणोत्सर्गाशी संबंधित संशोधन करणार
Share this Newz

द न्यूज बिझ टाईम्स, पुणे : बालपणीच विज्ञानाची गोडी लागली आणि तो छंद बनलात्याच छंदामुळे अवघ्या ११ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचण्याचा मान मिळालाही कथा आहे पुण्यातील रोहन भंसाळी याचीएवढ्या छोट्या वयात अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक् अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासाया संस्थेच्या योजनेत सहभागी होण्याची संधी त्याला मिळाली आहेत्यातून पुण्याच्या शिरपेचातही आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नासाच्या अंतराळ मोहिमांची रचना निर्मिती करून त्यात प्रयोग करण्याची संधी विद्यार्थ्यांना देणारा क्यूब इन स्पेस प्रोग्राम ही योजना आहेयात वास्तविक जगातील किंवा पृथ्वीशी संबंधित समस्यांबाबत छोट्या पातळीवरील प्रयोग केले जातातयातच ११ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना तळहातावर मावेल एवढा उपग्रह तयार करण्यासाठी आवाहन करण्यात आले होतेअंतराळात जाणारे मनुष्यसामान आणि यान यांचे अती तीव्र अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्गापासून (यूव्हीसी, बीअधिक चांगले रक्षण व्हावेयासाठी विविध औद्योगिक साहित्याचा यात अभ्यास करण्यात येणार आहेयामध्ये रोहन भंसाळी याच्या प्रयोगाचीही निवड झाली आहेयासाठी नासाच्या चमूने विविध पातळ्यांवर अत्यंत काटेकोरपणे चाचण्या घेतल्या.

रोहन याने तयार केलेल्या क्यूबमध्ये ४ यूव्ही सेन्सॉर्स३ निवडक पदार्थ (रेशीमअॅल्युमिनियम आणि प्लॅस्टिकआणि मायक्रोप्रोसेसर यांचा समावेश आहेया क्यूबने स्ट्रॅटोस्फिअरमध्ये केलेल्या १२ तासांच्या प्रवासात प्रत्येक  मिनिटांनी यात माहिती गोळा करण्यात येणार आहेस्ट्रॅटोस्फिअर हा वातावरणातील १,६४,०४१ फूट उंचीवरील भाग असतोत्या तुलनेत विमाने ही समुद्रसपाटीपासून ३०,००० फुटांवरून उडतात.

विद्या व्हॅली स्कूलमध्ये सहावीत शिकणाऱ्या रोहनने आत्मविश्वास आणि उत्साहाने सांगितले, “शाळेतील माझ्या शिक्षिका जया मॅडम यांच्याकडून मला या प्रकल्पाची माहिती मिळालीमला विज्ञानाची आवड असल्यामुळे त्यासाठी अर्ज करण्यासाठी माझी निवड करण्यात आलीविद्या व्हॅलीच्या प्रिंसिपल नलिनी सेनगुप्ता अशा उपक्रमांमध्ये सहभागी नेहमी होण्यासाठी प्रोत्साहन देतातयात शाळेचा पाठिंबा आणि प्रोत्साहन माझ्यासाठी खरोखरच खूप महत्त्वाचे ठरले.”

तो पुढे म्हणाला, “मला विज्ञानात रस आहे आणि मला अभ्यासक्रमाशिवायही इतर उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला आवडतेविज्ञानातील नवीन संकल्पना जाणून घ्याव्यातया हेतून मी यात हभागी होण्याचे ठरवलेकुटुंबातील सदस्यांनीही मला उत्तेजन दिले आणि पाठिंबा दिला.”

या प्रकल्पाविषयी अधिक माहिती देताना रोहन म्हणाला, “अंतराळ हे खूप रोमांचक आहे आणि अजूनही खूप अज्ञात आहेआपल्या सूर्यमालेची त्रिज्या जवळपास ९ अब्ज किमी एवढी आहे आणि एका सूर्यामध्ये १३ लाख पृथ्वी बसू शकतातमी संशोधन करत असताना या अचंबित करणाऱ्या गोष्टी मला कळाल्याम्हणूनसामान्यपणे वापरल्या जाणार्‍या पदार्थांवरउदाकपड्यांसाठी रेशीम किंवा अन्न आणि औषधांच्या पॅकेजिंगवर होणारा परिणाम याचा अभ्यास मला करायचा होता.”

या प्रकल्पावर अधिक प्रकाश टाकताना तो म्हणालामी सेन्सॉर्सएक छोटा संगणक आणि कोडेड प्रोग्राम असलेला 4 बाय 4 सें.मी.चा प्रयोग तयार केलातो आपोआप चालेलमला अतिशय विलक्षण अनुभव मिळाला आणि या प्रयोगाचा परिणाम पाहून मी खूप उत्साहित आहे.”

येथे हे उल्लेखनीय आहेकी अंतराळ मोहिमेदरम्यान मानवी शरीरावर किरणोत्सर्गासारख्या प्रतिकूल परिणाम करणाऱ्या धोक्यांवर नासा संशोधन करत आहेअगदी बचावात्मक कवच असतानाही अंतराळवीरांना दररोज छातीच्या एक्सरेच्या तुलनेत ८ पट किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागतेत्यामुळेअतिनील किरणांपासून कोणता पदार्थ जास्त संरक्षण देईल आणि अंतराळवीरांचा बचाव करेल हे ठरवण्यासाठी दैनंदिन वापरात वापरले जाणारे रेशीमअॅल्युमिनियम व प्लॅस्टिक अशा साहित्याची निवड करण्यात आली.


Share this Newz