द न्यूज बिज् टाईम्स, ज्ञानेश्वर टकले :
विधानसभा पोटनिवडणूक तिकीटवरून आमच्या कुटुंबात कोणताही वाद नाही. विरोधकांनी उठवलेलं हे वावटळ आहे, अशी प्रतिक्रिया दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी दिली.
भाजपकडून तिकीट जाहीर झाल्यानंतर त्या माध्यमांशी संवाद साधत होत्या.
अश्विनी जगताप म्हणाल्या, की पक्षाच्या धोरणाप्रमाणे काम करीत राहणार आहे. भाजपने जगताप कुटुंबाबाहेरचा उमेदवार दिला असता, तरी आम्ही पाठिंबा दिला असता. आम्हाला पक्षानेही तशा सूचना दिल्या होत्या. तसेच माझे दीर शंकरशेठ जगताप हे मला मुलासारखे आहेत. आम्ही एक आहोत. वावटळी न उठविण्याची हात जोडून विनंती त्यांनी विरोधकांना यावेळी केली. गेली तीस वर्षे आमचे कुटुंब एक असून पुढेही एकत्रच राहणार आहे. मेट्रो सिटी बनविण्याचे साहेबांचे अपूर्ण राहिलेले स्वप्नही साकार करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
मी गेली तीस वर्षे निवडणुकांचा अनुभव घेत आहे. लक्ष्मणभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून, कार्यकर्ते, नगरसेवकांना सोबत घेऊन सांगवी, पिंपळे गुरवसह संपूर्ण परिसर पिंजून काढायचे. त्यामुळे जरी फ्रंटला नसले, तरी पाठीमागून माझे प्रचाराचे काम चालायचे. चांगला अनुभव असल्याने कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जायचे, याचा अभ्यास आहे, असेही अश्विनी जगताप यांनी सांगितले.
Leave a Review