भाजपकडून चिंचवड व कसबा पोटनिवडणूकीसाठी उमेदवार जाहीर

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर येत्या 26 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून दोन्ही जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी स्थायी समितीचे माजी सभापती हेमंत रासने यांना भाजपची उमेदवारी दिली आहे.

महाविकास आघाडीतर्फे दोन्ही ठिकाणी एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, तर कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने दोन्ही मतदारसंघातील उमेदवार घोषित केले आहेत. या दोन्ही उमेदवारांचे अर्ज सोमवारी निवडणूक आयोगाकडे दाखल केले जाणार आहेत. सकाळी अकरा वाजता हेमंत रासने यांचा, तर दुपारी एक वाजता अश्विनी जगताप यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत.


Share this Newz