द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : अरविंद एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रणव राव यांच्या वाढदिवसानिमित्त ‘अरविंद एज्युकेशन सोसायटी बुक फेअर २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. हे बुक फेअर सोमवारी 6 फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत जुनी सांगवीतील लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल येथे भरणार आहे.
या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक व नागरिकांनी भेट देऊन आपल्या आवडीची पुस्तके खरेदी करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आरती राव यांनी केले आहे. या पुस्तक प्रदर्शनात पुस्तकांच्या खरेदीवर 15 ते 20 टक्के सवलत देण्यात येणार आहे. याचा सांगवीतील पुस्तकप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमाला अनिता नानासाहेब शितोळे, सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, शितोळे नगर क्रीडा मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय शितोळे, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे उपस्थित राहणार आहेत.
Leave a Review