भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी मोफत प्रदूषण नियंत्रण चाचणी (पीयूसी) 

आमदार लक्ष्मण जगताप व माजी नगरसेवक शंकर जगताप मित्र परिवाराच्या वतीने आयोजन 
Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :     भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आमदार लक्ष्मण जगताप व माजी नगरसेवक शंकर जगताप मित्र परिवाराच्या वतीने दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी मोफत प्रदूषण नियंत्रण चाचणी (पीयूसी) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला दुचाकी व चारचाकी वाहन चालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकात आयोजित या उपक्रमात चारशे दुचाकी व पन्नास चार चाकी वाहनांची मोफत प्रदूषण नियंत्रण चाचणी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक शंकर जगताप, उद्योजक माऊली जगताप, माजी ज्येष्ठ नगरसेविका शोभाताई आदियाल, युवा नेते अमरसिंग आदियाल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

या उपक्रमाविषयी बोलताना शोभाताई आदियाल म्हणाल्या, की दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे प्रदूषणात आणखी भर पडत आहे. दहा हजार किलोमीटर वाहन चालल्यानंतर त्याची पीयूसी करणे अनिवार्य असते. मात्र, प्रदूषण नियंत्रण तपासणीकडे वाहचालक दुर्लक्ष करतात. परिणामी प्रदूषणात वाढ होत आहे. याविषयी वाहनचालकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


Share this Newz