अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :   भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दहावीत प्रथम क्रमांक मिळविलेल्या धनश्री पाटीलच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, देशमुख, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम माध्यमिकच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, लिटल फ्लॉवर प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पूजा पोटपल्लीवार, भारतीय विद्यानिकेतन प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, अरविंद एज्युकेशन सोसायटी ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका पिंकी मनिकम, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, भटू शिंदे, उदय फडतरे, तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, देशभक्तीपर गीत, ‘जय हो’ हे नृत्य, ‘देश रंगीला’ हे गीत व ‘विविधतेत एकता’ हे मूकनाट्य सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्याचे महत्त्व सांगितले. भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी भारताचे भविष्य आणखी उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तर प्रणव राव यांनी विद्यार्थ्यांना एकतेचे महत्त्व सांगितले. अतुल शितोळे यांनी तिरंगा ध्वज व त्याचे महत्त्व स्पष्ट करीत स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानाविषयी माहिती सांगितली. स्मिता बर्गे व शिक्षिका सुषमा शिरावले यांनी क्रांतिकारकांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. सूत्रसंचालन शिक्षिका ललिता गिल व शिक्षिका ज्योती मोरे यांनी केले.


Share this Newz