उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ४१, ४४, ४५ मध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून पिंपळे गुरव, सांगवी येथे व्यायाम शाळा (ओपन जिम) लोकार्पण, तसेच वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप, माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पतरू इस्टेट फेज ३ व ट्रेझर पार्क येथे व्यायाम शाळा साहित्य (ओपन जिम) सोहळा संपन्न झाला. तसेच काशीद पार्क, रामकृष्ण मंगल कार्यालय, साई चौक येथे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, शशिकांत कदम, सागर आंघोळकर, महेश जगताप, माजी नगरसेविका शोभाताई आदियाल, वैशाली जवळकर, सामाजिक कार्यकर्ते माऊली जगताप, बाळासाहेब देवकर, संजय जगताप, नवनाथ जांभूळकर, शिवाजी कदम, शशिकांत दुधारे, राहुल जवळकर, अमरसिंग आदियाल, सखाराम रेडेकर, अजय दूधभाते आदी भाजप कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share this Newz