आमचा “दादा” लय रुबाबदार..!

Share this Newz

आमचा “दादा” लय रुबाबदार

माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती सहसा जाहीर शुभेच्छा देत नाहीत. कोणी दिल्याच तर त्याला ” दुकानदारी ” नावाचा शब्द वापरला जातो. त्यामुळे माझी काही दुकानदारी नसल्याचे स्पष्ट करुन ” दादा” आपल्याला वाढदिवासाच्या शुभेच्छा देतो.

पवार साहेबांनतर शेतीची जाण असणारा नेता म्हणून अजित पवारांकडे पाहीले जाते. अस्सल ग्राम्य ढंगातील तुमची भाषणे शेतकऱ्यांना आपलिशी वाटतात. एखादा दुध उत्पादक शेतकरी तुमच्या दौऱ्यात दिसला तर , गाडी थांबवून चारा व कुट्टीची माहिती घेताना आम्ही पाहीले आहे. दुधाचे दर व दुधसंघाचे नाव विचारण्याची आपली मार्मिक पद्धत शेतकऱ्यांमध्ये खुप प्रचलित आहे.

पुरंदर तालुक्यातल्या जमिनी पांढऱ्या पडल्याचे तुम्ही पाहीले. लागलीच कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना तुम्ही फोन लावून लक्ष घालण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी गोयल साहेब स्वता शेतावर उपस्थित असल्याचे आम्ही अनुभवले आहे.

परभणी दौऱ्यात तुमच्या शासकीय गाडीत बसण्यास सांगितले. मुलाखत सुरु होती तुम्ही फाईल चेक करत माझ्या प्रश्नांना उत्तरे देत होता. प्रवासात एका शेतकऱ्याने बियाणे उपलब्ध नसल्याची दोन ओळीची चिठ्ठी तुमच्या हातात दिली. चिठ्ठी वाचल्यानंतर लागलीच तुम्ही गाडी मागे घेण्यास सांगितली. संबधीत शेतकऱ्याची विचारपुस करुन त्याला लागलीच बियाणे मिळवून दिले.

मध्यंतरी वर्तमान पत्रात तुम्ही एका अपघातग्रस्ताला दवाखान्यात घेवून गेल्याची बातमी वाचली. शेतकरी कुटूंबातील अपघातग्रस्त युवकाचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्याला तुम्ही दवाखान्यात पोहचवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच युवकाची अस्थेने चौकशी करण्याची बुद्धी फक्त तुमच्या सारख्या तळमळणाऱ्या व्यक्तीलाच असू शकते.

माझ्या पत्रकारितेला नुकतीच सुरवात झाली होती. एका माध्यम संस्थेने “दादा” नावाचा विशेषांक करण्याचे ठरवले होते. विशेषांकासाठी मुलाखत घेण्याच्या उद्देशाने बारामती हॉस्टेल मध्ये पहील्यांदा तुम्हाला भेटलो. मुलाखत सुरु होण्या अगोदर तुम्ही म्हणाला होता , माझ्या विषयी तु चांगलच लिहशील , मंत्र्याचा नंबर मिळालाय म्हणून दणा दणा फोन नको करु.. ! दादा , हे फक्त तुम्हालाच जमू शकते कारण हा तुमच्या भाषेचा लहेजा आहे. यात ठरवून सुद्धा बदल होणार नाही. याच विशेषांकासाठी दोन दिवस तुमच्या सोबत होतो. दोन दिवसातील अंदाजे सोळा तास तुमच्या सोबत असेल. या दरम्यान आपल्या भेटीसाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय कसा द्यायचा हे शिकण्याची संधी मला मिळाली होती.

सध्या तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात. दुष्काळात यंत्रणा कशी राबवायची या संदर्भाने तुमचे भाषण सुरु होते. विरोधक सुद्धा शांतपणे भाषण ऐकत होते. तुमच्या मुद्यांवर अधारीत ॲक्शन प्लॅन महाविकास घघाडीने केला. विरोधी बाकावर असताना अदिवासी विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड तुम्ही सभागृहात मांडत होता. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचार सुद्धा सत्ताधारी गुमान ऐकत होते.

पत्रकारितेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर भटकंती सुरु असते. “बरे झालं दादा आले” या आशयाच्या प्रतिक्रीया शेतकरी देवू लागले आहेत.दादांची महाराष्ट्रातील जनतेला गरज असल्याचे विरोधी आमदार सुद्धा खाजगीत सांगत असतात.

मध्यंतरी तुमच्या कडून ओघाने काही विचित्र शब्द बोलले गेले. मिडीयाने तुम्हाला धारेवर धरले. जो व्यक्ती तुमच्या जवळ आला त्यालाच तुमचा स्वभाव कळाला. विचित्र शब्दांचा वापर चुकीचाच आहे. त्याचा जाहिर आत्मक्लेष तुम्ही केला. आपल्या भाषणातून झालेल्या वक्तव्याच्या संदर्भाने आपण नेहमी दिलगिरी व्यक्त करत असतात. यातच आपल्या स्वभावाचे पैलू अधोरेखित होतात. आज तुम्हाला सोडून गेलेले आमदार नगरसेवक , कार्यकर्ते खरच काळवंडले आहेत.
शेती व ग्रामविकासासाठी महाराष्ट्र तुम्हाला खुणावतो आहे. विरोधी पक्ष या नात्याने तुम्ही लोकांमध्ये जात आहात. जनता तुमच्या कामाला नक्कीच न्याय देईल..!

तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

विशाल केदारी
Mobile no : + 91 7719860058
Email : vishalkedari1@gmail.com

आमचा “दादा” लय रुबाबदार https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0k3rYeHiMNmQaqvnKAomn3hqfGkSedsjbqpCvXPTLFxYfNCkzYihwCaiyXrbaKVQPl&id=100001686540595


Share this Newz