द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :
जागतिक आरोग्य दिनानिमित्त दीपक माकर यांच्या स्मरणार्थ आरोग्य सेवा गौरव सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संजय कणसे (श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट अध्यक्ष), अस्मिता कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या), चंद्रकांत सोनवणे (आदर्श शिक्षक), सुभाष जाधव (जय मल्हार क्रांती संघटना अध्यक्ष) यांच्या हस्ते आरोग्य सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी संजय मानमोडे, सुनील चव्हाण, प्रकाश खंडागळे, रमा बाराथे, राकेश चनडालिया, संगीता भालचंद्र, जया धोत्रे, सुवासिनी गोसावी, सुभोद्रा गायकवाड, आरोग्य निरीक्षक सुवासिनी गोसावी, शुभ गायकवाड उपस्थित होते.
सुभाष जाधव म्हणाले, की आपला परिसर स्वच्छ राहिल्यास आपले जीवन आनंदी होते. तर प्रत्येकाने स्वच्छतेची शपथ घेणे गरजेचे आहे. सूत्रसंचालन दादा मदने यांनी, तर आभार रवींद्र बाईत यांनी मानले.







Leave a Review