द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुरंदर तालुक्यातील प्रा. दिगंबर दुर्गाडे यांचा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये वाणिज्य व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॅा. लतेश निकम, डॉ. नरसिंग गिरी, डॉ. क्रांती बोरावके उपस्थित होते.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी महाविद्यालयामध्ये चालणाऱ्या विविध पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाची माहिती घेत बँकिंग क्षेत्रामध्ये वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना असलेल्या संधीकडे लक्ष वेधले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी बँकेच्या कामकाजाचा असलेला मोठा आवाका आणि पूर्वीच्या कामाचा अनुभव विचारात घेत प्रा. दिगंबर दुर्गाडे यांची निवड अपेक्षित होती.







Leave a Review