ओमसाई फाऊंडेशन तर्फे सांगवी पोलीस ठाण्याला अग्निशामक रोधक सिलेंडर भेट

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : 

पिंपळे गुरव येथील ओमसाई फाऊंडेशन तर्फे सांगवी पोलीस स्टेशनला आमदार लक्ष्मण जगताप व उद्योजक माऊली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अग्निशामक रोधक सिलेंडर भेट देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलिस उपनिरीक्षक नानाश्री वरुडे, हवालदार नलिनी गायकवाड, रमेश चौधरी, हवालदार रेखा साबळे, राजू अवळेकर,
रवी खोकर, शैलेश थोरात आदी उपस्थित होते.

ओमसाई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले, की बऱ्याच शासकीय इमारतींमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्रकार झाले आहे. त्यामुळे शासनाचे व नागरिकांचे दस्त ऐवज जळून गेल्याने खूप मोठे आर्थिक व मानसिक नुकसान झाले. अशी घटना सांगवी पोलीस ठाण्यात होऊ नये, म्हणून आपली समाजप्रती नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही सांगवी पोलीस स्टेशनला फायर सिलेंडर भेट दिले.

सांगवी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे म्हणाले, की पोलिस स्टेशनमध्ये अग्नी रोधकचि अत्यंत गरजेचं होते.तसेच फाउंडेशनतर्फे फायर प्रशिक्षण घेण्यात यावे. ओम साई फाऊंडेशनने केलेल्या चांगल्या उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो.


Share this Newz