गायिका सावनी रवींद्रला पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशन तर्फे कलाविभूषण पुरस्कार जाहीर

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :

राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा पहिला कलाविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनच्या कार्यकारिणीची नुकतीच कासारवाडी येथील हॉटेल कलासागरच्या सभागृहात बैठक संपन्न झाली.

या बैठकीत फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा पहिला कलाविभूषण पुरस्कार चिंचवड येथील प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांना देण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला असून १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सावनी रवींद्र यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष विजयराव भिसे यांनी दिली.

यावेळी पार पडलेल्या या बैठकीस सभेत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयराव भिसे, माजी अतिरिक्त आयुक्त अमृतराव सावंत, डॉ. रवींद्र घांगुर्डे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश पदवीधरच्या अध्यक्षा शिल्पा बिडकर, जीवन भोपे, निलांबरी भिसे आदी सदस्य उपस्थित होते.

राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेत्या ठरलेल्या सावनी रवींद्र यांनी आपल्या गायनातून पिंपरी चिंचवड शहराचे नाव उंचावले आहे. गायन क्षेत्रातील सावनीचे योगदान लक्षात घेऊन फाउंडेशनच्या पहिला कलाविभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.
– विजयराव भिसे, संस्थापक, पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशन


Share this Newz