तानाजीभाऊ जवळकर सोशल फाऊंडेशनच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना पेन, गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा…

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : 

पिंपळे गुरव येथील तानाजीभाऊ जवळकर सोशल फाऊंडेशनच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना पेन, पिण्याच्या पाण्याची बाटली व गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तानाजी जवळकर, पिंपळे गुरव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तृप्तीताई जवळकर यांच्या हस्ते आपल्या परिसरातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना पेन, पिण्याच्या पाण्याची बाटली व गुलाबपुष्प देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच विद्यार्थांना प्रोत्साहन देण्यात आले.

याप्रसंगी किलबिल स्कुलचे प्रमुख नासीर सौदागर, सुभाष जाधव, सुरेश देवराज, साबळे सर, शेख सर, विनोद रत्नम, दत्तात्रय कदम, सचिन भाबुंरे, ताहीर शेख, संजय साळुंखे, पिंपळे गुरव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष साहिल रोकडे, किलबिल स्कुलचा शिक्षक वृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तानाजी जवळकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात सूचना दिल्या. घाबरून न जाता किंवा घाई न करता मन शांत ठेवून पेपर लिहा. दहावी म्हणजे आयुष्यातील एक महत्त्वाचा वळणाचा मार्ग असल्याचेही त्यांनी सांगितले.

तृप्तीताई जवळकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आवाहन केले, की मनात परीक्षेची भीती न बाळगता पेपर द्या. गोंधळून न जाता दिलेल्या सूचनांचे पालन करून परीक्षेला सामोरे गेल्यास यश आपलेच आहे.


Share this Newz