घोलप महाविद्यालयाच्या ‘प्रतिबिंब’ नियतकालिकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :

सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये ‘आरोग्य हीच संपत्ती’ चा संदेश देणार्‍या ‘प्रतिबिंब’ या वार्षिक नियतकालिकाचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक करत असताना प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी कोविड – १९ काळामध्ये आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘प्रतिबिंब’ची संकल्पना स्पष्ट केली . त्याचबरोबर या वैश्विक महामारीच्या काळामध्ये महाविद्यालयामार्फत सामाजिक जाणिवेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या मास्क व सॅनिटायझर वाटप, लसीकरण मोहिमेतील सहभाग, कुटुंब सर्वेक्षण अशा विविध उपक्रमांचा लेखाजोखा मांडला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड – १९ काळामध्ये आरोग्य व्यवस्थेचे महत्व स्पष्ट झाले असताना त्यादृष्टीने आरोग्य हीच संपत्तीचा संदेश देणार्‍या आरोग्य विषयावर नियतकालिक प्रकाशित केल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले. तसेच स्वस्थ मानसिक व शारीरिक आरोग्य, फास्ट फूड व बदलती शैली, व्यायाम, आयुर्वेद, ताण – तणाव व्यवस्थापन, कोविड – १९ इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण लेखनाची मांडणी केल्याबद्दल विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.

या समारंभाचे सूत्रसंचलन डॉ. सुवर्णा खोडदे तर आभार प्रदर्शन डॉ. लतेश निकम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, कार्यकारी संपादक डॉ. सुवर्णा खोडदे, नियतकालीक समिती सदस्य प्रा. राजश्री मोरे, प्रा. सचिन भोसले, लेफ्ट. विठ्ठल नाईकवाडी, प्रणीत पावले उपस्थित होते.
आरोग्य विषयक जनजागृतीसाठी विद्यार्थी व शिक्षकांच्या लेखणी मधून एक नाविन्यपूर्ण पाऊल उचलल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले असून सर्व स्तरातून महाविद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Share this Newz