द न्यूज बिज् टाईम्स, ज्ञानेश्वर टकले :
रशिया व युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरातील दोन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या घरी भेट देत महापौर माई ढोरे यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांची विचारपूस करीत धीर दिला. तसेच या विद्यार्थ्यांना व्हिडीओ कॉल करीत तेथील परिस्थिती जाणून घेतली.
सांगवी परिसरातील गायत्री विजयकुमार पोरे व आदित्य लक्ष्मण काची युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. युक्रेन व रशिया यांच्यातील युद्धाची परिस्थिती पाहता या विद्यार्थ्यांचे पालक भयभीत झाले आहेत. त्यांना धीर देण्यासाठी महापौर माई ढोरे यांनी भेट घेऊन त्या मुलांशी व्हिडीओ कॉलवर संपर्क साधून ते सुखरूप असल्याची माहिती घेतली आणि पंतप्रधान कार्यालयाला कळविले. आपण घाबरून जावू नका. सुखरूप घरी याल असा विश्वासही विद्यार्थ्यांना दिला.
आपले पाल्य लवकरात लवकर सुखरूप घरी येतील, असा दिलासाही महापौर माई ढोरे यांनी पालकांना दिला. यावेळी युवा नेते जवाहर ढोरे, गणेश काची उपस्थित होते.








Leave a Review