अजित गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : 
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले असून, शहराध्यक्षपदासह तीनही विधानसभा मतदारसंघानिहाय कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी भोसरीतील नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आणि भोसरी मतदारसंघातील नेहरूनगर येथील नगरसेवक राहुल भोसले यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
युवकच्या शहराध्यक्षपदी युनुस शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवकच्या कार्याध्यक्षपदी पिंपरी मतदारसंघातून निलेश निकाळजे, चिंचवड मतदारसंघातील प्रसन्न डांगे आणि भोसरीतील योगेश गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला शहराध्यक्षपदी कविता आल्हाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नियुक्ती पत्र दिले आहे.
तर महिला कार्याध्यक्षपदी चिंचवडमधील ज्योती गोफणे, काळभोरनगर येथील सविता धुमाळ आणि सांगवीतील उज्ज्वला ढोरे यांची निवड करण्यात आली.

Share this Newz