द न्यूज बिज् टीम, पुणे :
जागतिक आरोग्य संघटना/युनिसेफ यांच्या संयुक्त देखरेख कार्यक्रमाने (जेएमपी) प्रसिद्ध केलेल्या अगदी अलीकडील अहवालानुसार, जगभरात ७८५ दशलक्ष लोकांना मुलभूत पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही . याशिवाय, २ अब्ज लोकांना- ३ पैकी १- शौचालये उपलब्ध नाहीत. पाणी व स्वच्छता यांच्या शाश्वत उपलब्धतेची तसेच व्यवस्थापनाची निश्चिती करणाऱ्या शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमांक ६ मध्ये, जागतिक राजकीय अजेंडावर पाणी व स्वच्छतेच्या मुद्दयांवर अधिक लक्ष दिले जात आहे, असे दिसून येते.
भारतात १.३८ अब्ज लोकसंख्येपैकी २२९ दशलक्ष नागरिकांना सुधारित स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत, ते उघड्यावर शौचाला बसतात आणि पाण्याद्वारे होणाऱ्या आजारांना हातभार लावतात. ही समस्या हाताळण्यातील मायक्रोफायनान्स उद्योगाची भूमिका म्हणूनच लक्षणीय आहे. मायक्रोफायनान्स उद्योग वित्तपुरवठ्यातील त्रुटी भरून काढत आहे आणि सामाजिक उतरंडीच्या तळाशी असलेल्या लोकांना तारणमुक्त सुलभ कर्ज उपलब्ध करून देत आहेत. हा उद्योग वॉश (डब्ल्यूएएसएच) कर्जांना प्रोत्साहन देत आहे, कारण ग्रामीण परिसंस्थेच्या सामाजिक-आर्थिक विकासात व स्थैर्यात पाण्याची टंचाई हा मोठा अडथळा आहे. याशिवाय, घरांच्या आवारांमध्येच सुरक्षित पाणी व सुधारित स्वच्छतागृहे उपलब्ध झाली, तर नागरिकांच्या वेळेची बचत होईल आणि हा निम्न उत्पन्न गटातील कुटुंबे हा वेळ उत्पन्न मिळवण्यासाठी उपयोगात आणू शकतील.
एमएफआयएनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक डॉ. अलोक मिस्रा म्हणाले की वॉश कर्जे ही एसडीजी जागतिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यातील एक खूप महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि उद्योग या कार्याप्रती बांधील आहे. शाश्वत उपजीविकेची निश्चिती करण्याच्या उद्दिष्टासह हा उद्योग Water.org सारख्या संस्थांशी सहयोग करत आहे. यामुळे संसाधने, तांत्रिक सहाय्य, प्रशिक्षण तसेच परवडण्याजोगा वित्तपुरवठा सुलभ करण्यासाठी सहाय्य पुरवले जाते. निम्न-उत्पन्न कुटुंबांना त्यांच्या आवश्यकतेनुसार, हाउस वॉटर कनेक्शन/पाइप्ड वॉटर, बोअरवेल किंवा हॅण्डपम्प, रूफटॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग, न्यू टॉयलेट (सेप्टिक/पिट), वॉटर अँड सॅनिटेशन कॉम्बिनेशन अशा अनेक प्रवर्गांखाली, पाणी व स्वच्छता कर्जे पुरवली जातात. सुरक्षित पाणी व वैयक्तिक स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध झाल्यास, ग्राहकांना वाढीव उत्पादनक्षमता वाढीव उत्पन्न व वाढीव वेळ हे लाभ मिळू शकतील.”
हे क्षेत्र, वंचित समुदायांमध्ये, वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी व सुरक्षित पेयजल यांसाठी यशस्वीरित्या योगदान देत आहे. उदाहरणार्थ, ऑक्टोबर २०२१ मधील आकडेवारीनुसार, क्रेडिटअॅक्सेस ग्रामीणने १,५५५.८८ कोटी रुपयांची पाणी कर्जे वितरित केली आहेत, तर ११५.२९ कोटी रुपयांची स्वच्छता कर्जे वितरित केली आहेत. याचा अनुक्रमे लाभ ९,०२,४९२ आणि २,१५,६०२ ग्राहकांना झाला आहे. फ्युजन मायक्रोफायनान्सने मुलींच्या सरकारी शाळांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी शौचालये बांधली आहेत आणि याचा लाभ सहा राज्यांतील ८,२५८ लोकांना होत आहे. याशिवाय स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी आरओ इन्स्टॉल केले आहेत, याचा लाभ चार राज्यांतील २,२४४ विद्यार्थ्यांना होत आहे. सॅनिटेशन इम्प्रुव्हमेंट लोन्सच्या माध्यमातून मुनोत मायक्रोफिन २४,१४० ग्राहकांपर्यंत पोहोचली आहे. कंपनीने या ग्राहकांना शौचालयात बदल करवून घेणे, नवीन शौचालय बांधणे, शौचालयातील प्लम्बिंगची कामे, शौचालयांची देखरेख आदींसाठी कर्जे पुरवली आहेत. त्याचप्रमाणे सत्या मायक्रोकॅपिटलने पाणी व स्वच्छता कर्जे पुरवून २१,५५१ ग्राहकांना लाभ मिळवून दिला आहे. युनिटी स्मॉल फायनान्स बँक म्हणजेच पूर्वीच्या सेंट्रम मायक्रोक्रेडिटने ४०.०५ कोटी रुपयांची वॉश लोन्स वितरित केली आहेत व याचा लाभ १३,५५८ ग्राहकांनी घेतला आहे.
भारतभरात कार्यक्षेत्र असलेल्या आणि ३५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ६११ जिल्ह्यांमधील ६ कोटी स्त्रियांशी जोडून घेणाऱ्या मायक्रोफायनान्स उद्योगामध्ये एनबीएफसी-एमएफआय, बँका, स्मॉल फायनान्स बँका, बँकिंग प्रतिनिधी व एनबीएफसी यांचा समावेश होतो. आर्थिक संसाधनांची उपलब्धता ही निम्न उत्पन्न लोकसंख्येला या सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सक्षम करण्याची गुरूकिल्ली आहे, यावर या उद्योगाद्वारे दिल्या जाणाऱ्या पाणी व स्वच्छता कर्जांद्वारे शिक्कामोर्तब होते. पाणी व स्वच्छतेसाठी कर्जे देणे हे मागणीवर आधारित सोल्यूशन्सचे उदाहरण आहे. यामध्ये कुटुंबाला पाणी व स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात आणि ग्राहकाला त्याच्या घरात पाणी व स्वच्छतेशी निगडित मालमत्ता उभारण्यासाठी सूक्ष्मकर्जांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते.












Leave a Review