द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
सांगवी येथे लक्ष्मण जगताप मित्र परिवार यांच्या वतीने आमदार क्रिकेट चषक स्पर्धा सुरू गेली दहा दिवसांपासून सुरू आहेत. माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून विविध भागातून या स्पर्धेत ९२ संघांनी भाग घेतला. रविवारी अंतिम सामन्यासाठी माजी महसुलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अंतिम सामन्यास उपस्थिती लावली.
यावेळी त्यांच्या हस्ते आमदार लक्ष्मण जगताप मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. या स्पर्धे दरम्यान महिला डॉक्टर, पत्रकार, पोलिस, नगरसेवक यांनीही मैत्रीपूर्ण क्रिकेट लढती खेळत क्रिकेटचा आनंद घेतला.
यावेळी महापौर उषा ढोरे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, सागर आंगोळकर, संतोष कांबळे,अजय दुधभाते, उषा मुंढे, हर्षल ढोरे, मनिष कुलकर्णी, जवाहर ढोरे, माधवी राजापुरे, सांगवी पोलिस गुन्हे निरिक्षक सुनिल तांबे आदी उपस्थित होते.







Leave a Review