लायन्स क्लबकडून दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे कार्य : महापौर माई ढोरे

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी :

‘रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा’ आहे या भावनेतून कार्य करत लायन्स क्लबच्या माध्यमातून गरजू दिव्यांगांसाठी मोफत जयपुर फुटचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. लायन्सच्या या उपक्रमामुळे खऱ्या अर्थाने दिव्यांगांचे जीवन सुलभ व आनंदी होईल. दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे आदर्शवत व कौतुकास्पद कार्य लायन्स क्लबने केले आहे असे गौरवोद्गार महापौर माई ढोरे यांनी व्यक्त केले .

नेहरूनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे लायन्स क्लब इंटरनॅशनल च्या वतीने दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम पाय रोपण (जयपूर फूट) आणि मोफत कृत्रिम हात तसेच पोलिओ कॅलिपर्स व कुबडे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापौर माई ढोरे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी नगरसेविका उषा मुंढे, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे, प्रांतपाल एमजेएफ लायन हेमंत नाईक, माजी प्रांतपाल रमेश शहा, जयपूर फुट ऍक्टिव्हिटी चेअरमन लायन दामाजी आसबे, लायन डॉ. राहुल सुराणा, लायन प्रा. अमृतराव काळोखे, ला. बालाजी आयनुळे, लायन अविनाश कुलकर्णी, इनरव्हिल क्लब पुणेच्या अध्यक्षा बबिता कौशिक, प्रमोद बोंडे, अशोक बनसोडे, विक्रम माने, दिपक बाळसराफ, प्रशांत कुलकर्णी, श्रीराम भालेराव, प्रशांत शहा, राजश्री शहा, किरण पवार, भरत इंगोले, सुनिल शेखर, भुपेंद्र दुल्हट, राजश्री बन्सल, कांतीलाल पालेशा, ओमप्रकाश रांका, शैलेश बुरसे, डॉ. हेमंत अग्रवाल, डॉ. राजेंद्र घाटकर, डॉ. रवि टेमगिरे, डॉ. राजेश दळवी, डॉ. पटवर्धन, विकास साखरे, समाधान आसबे उपस्थित होते.

यावेळी राज्याच्या विविध ठिकाणांहून आलेल्या दिव्यांगांना महापौर यांच्या हस्ते व्हील चेअर कुबड्या व अन्य साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना महापौर ढोरे म्हणाल्या, लायन्स क्लबच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे .अशाच प्रकारचे समजोपयोगी कार्य करण्यासाठी अन्य सेवाभावी संस्थांनीही पुढाकार घ्यायला हवे.
लायन दामाजी आसबे यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. सर्व लायन्स पदाधिकारी व सदस्यांच्या सहकार्याने आगामी काळातही असे उपक्रम राबविण्यात येथील असा मनोदय आसबे यांनी व्यक्त केला. यावेळी जयपूर फूट संकल्पनेचे प्रणेते दिवंगत हसमुखभाई मेहता याना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

डॉ. अस्मिता सुराणा यांनी प्रास्तविक केले. संजय लकडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.अमृतराव काळोखे यांनी आभार मानले.

लायन्स क्लब इंटरनॅशनलने नेहमीच समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. जयपुर फुट ॲक्टिविटीसाठी लायन्सचे सर्व पदाधिकारी सर्व रिजन प्रेसिडेंट व सभासद यांनी परिश्रम घेतले. शिबिरासाठी वायसीएम रुग्णालय तसेच शहरातील अन्य रुग्णालये,डॉक्टर, टेक्निशियन यांचे सहकार्य लाभले. राज्याच्या विविध ठिकाणाहून आलेल्या तीनशेहून अधिक दिव्यांगांना या शिबिराचा लाभ मिळाला.
– दामाजी आसबे ,
डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन ,जयपूर फूट


Share this Newz