द न्यूज बिज् टीम, पिंपरी : पिंपळे गुरव येथील जवळकर नगरमध्ये तानाजीभाऊ जवळकर सोशल फाउंडेशनच्या वतीने आयुष्यमान भारत योजने अंतर्गत नाव नोंदणी केलेल्या सर्व नागरिकांना तानाजी जवळकर यांच्या वतीने आपल्या कार्यालयात पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विमा योजना कार्डचे वाटप करण्यात आले.
कुठल्याही पदावर नसतानादेखील तानाजी जवळकर यांनी परिसरातील साडेचारशे नागरिकांना या कार्डचे वाटप केले. त्यांच्या या कामामुळे सर्व कार्डधारकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. या कार्डमुळे नागरिकांना अनेक आजारांमध्ये मोफत हॉस्पिटल सुविधा मिळणार आहे. म्हणजेच पाच लाख रुपयापर्यंत आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे. याबद्दल नागरिकांनी तानाजी जवळकर यांचे आभार मानले. भविष्यात त्यांच्या हातून अशाच अनेक शासकीय योजना परिसरातील महिला, वृद्धांपर्यंत पोहोचाव्यात, तसेच आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये आपणच आमच्या भागाचे प्रतिनिधित्व करावे व महापालिकेमार्फत जास्तीत जास्त योजना राबवाव्यात, असा आग्रह धरला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्षा तृप्ती ताई जवळकर, युवा नेते तानाजीभाऊ जवळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप, युवा नेते अमरसिंग आदियाल, उद्योजक दीपक जवळकर, उद्योजक अतुल काशीद, सामाजिक कार्यकर्ते गणेश जगताप, गणेश जवळकर, रामदास पांढरे, दत्तात्रय कदम, सनी उभे, सुनिल खंदारे, नितीन लोहार, साहिल रोकडे, सागर शिंगाडे, आप्पा कळसकर, तसेच सर्व लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना तानाजी जवळकर यांनी सांगितले, की महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या अनेक योजना असतात. मात्र, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. परिणामी अनेकजण केवळ योजना माहीत नाहीत, म्हणून आरोग्याच्या बाबतीत चांगले उपचार घेऊ शकत नाहीत. आरोग्य विम्याच्या सुविधा महिला, ज्येष्ठांपर्यंत पोहोचाव्या या उद्देशाने आपण ही सुविधा आपल्या कार्यालयात नागरिकांना उपलब्ध करून दिली. याचा लाभ सुमारे साडेचारशे महिला व ज्येष्ठ नागरिकांनी घेतला. भविष्यातही अशा अनेक योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास कटिबद्ध असणार आहे.







Leave a Review