सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्यशोधक अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मान

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

जुनी सांगवी येथे फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन आण्णा भाऊ साठे विचार मंच व प्रभास केसरी यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा चंद्ररंग समुहाचे संचालक व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते समाज भुषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर दुर्घटनेतील लष्कर अधिकारी बिपिन रावत व सहका-यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला त्यावेळी उद्योजक शंकर शेठ जगताप म्हणाले की सामाजिक कार्य करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांना सन्मानित करून वेळो-वेळी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे व या सन्मानित कार्यकर्त्यांच्या पाठीवर पडणारी कौतुकाची थाप यामुळेच भविष्यात आणखीन सामाजिक कार्य करण्यासाठी तरुणांमध्ये नव चैतन्य व प्रेरणा मिळते. सामाजिक कार्यकर्ते दिवसरात्र जनसेवेसाठी कार्य करत असतात यामुळे समाजाच्या सर्व स्तरांतील घटकांना जनसेवेचा उपयोग होतो.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे, संदिप गायकवाड, आदिती निकम, कृष्णा भंडलकर, रंजना शिंदे, संतोष कांबळे यांना सन्मान चिन्ह, गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. याबरोबरच यश ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्येष्ठांचा उपस्थितांच्या हस्ते वाढदिवस साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष साहेबराव कांबळे, बाळासाहेब सोनवणे, दिलिप तनपुरे, चंद्रकांत बाराथे, विजय भोसले, रामभाऊ उप्पर, भिकन कांबळे आदी उपस्थित होते.

 


Share this Newz