पंचाहत्तर जणांचा सोळाशे किलोमीटर सायकल प्रवास ; ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपक्रम

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : 

ते कन्याकुमारी हा दक्षिण दिग्विजय सायकल राईड… एक अनोखा प्रवास पार पडला. यामध्ये एक हजार सहाशे किलोमीटरचा सायकल प्रवास ११ ते २० डिसेंबर केवळ दहा दिवसांत पूर्ण करण्यात आला. यामध्ये एकूण पंचाहत्तर सायकल पटूंचा सहभाग होता.


भारताच्या पंचाहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून एकूण पंचाहत्तर जणांनी पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास ११ ते २० डिसेंबर यशस्वीपणे पूर्ण केला. इंडो एथलेटिक सोसायटी ग्रुप तर्फे या सायकल प्रवासाचे आयोजन करण्यात आले होते. निगडी येथील भक्ती शक्ती चौकापासून सायकल प्रवासास सुरवात करण्यात आली होती.

पुणे ते कराड पहिला टप्पा होता. कराड ते बेळगाव, येल्लापूर, मुरुडेश्वर, मंगलोर, थलसरी, गुरूवयूर, अलपूझा, तिरुवनंतपुरंम, कन्याकुमारी असा टप्पा यशस्वीपणे सर्वांनी पार केला. कात्रज, खंबाटकी घाट यासारखे आठ ते नऊ घाट खडतर असूनही जिद्दीने सर्व जण खाली माना घालून सायकलला पँडल मारत न थांबता पार केले.
अंतिम टप्यात २० डिसेंबरला दुपारी २ वाजता ज्यासाठी हा प्रवास केला होता त्या कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्रात सर्वजण पोहचले. दुपारी ३.३० वाजता विवेकानंद स्मारकाला भेट देण्यासाठी बोटीने प्रवास केला. ७५ सायकलिस्ट एक थीम घेवून भारतातील सगळ्यात मोठ्या संख्येने मोठी राईड करत आले होते. याचे सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान होते.

प्रत्येक सायकलस्वाराचे लांब सायकलिंग करण्याचे एक स्वप्न असते, तसेच स्वप्न माझेही होते. इंडो एथलेटिक सोसायटी ग्रुपच्या सर्व सहकार्यामुळे पूर्ण करता आले. सर्वांच्या आशीर्वाद, पाठिंब्यामुळे इथपर्यंत पोहचलो. माणसाची इच्छा शक्ती असली की सर्व गोष्टी पूर्ण होतात. आत्तापर्यंत मी ४२००० किलो मीटर प्रवास केला आहे. पुणे ते कन्याकुमारी प्रवास पूर्ण करून आल्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
           – अभय खटावकर, सायकल पटू


आम्ही एक महिना आधी या उपक्रमाचे नियोजन करीत होतो. यामुळे पर्यावरण, आरोग्य याचा संदेश पुणे, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू चार राज्यांमध्ये पोहोचविला. वातावरणातील आर्द्रता आणि प्रतिकार शक्ती उष्णता या दोन गोष्टी किनारपट्टी भागात अनुभवयास मिळाले. वाटेत चाळीस किलोमीटर असलेले जंगल होते. जंगलातला रोड खूपच खराब होता. याकडे शासनाने लक्ष देणे अत्यावश्यक आहे. शहरात परत आल्यानंतर आपापल्या परिसरात जोरदार स्वागत करण्यात आले.
      – गजानन खैरे, प्रमुख, इंडो एथलेटिक ग्रुप


Share this Newz