सायबर हल्यांना आळा घालण्यासाठी टाटा टेलि बिझनेस सर्विसेसचे स्मार्ट इंटरनेट लाँच

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे :

टेलिबिझनेस सर्विसेस या भारतातील व्‍यवसायांसाठी डिजिटल कनेक्‍टीव्‍हीटी व क्‍लाऊड सोल्‍यूशन्‍सची सेवा देणा-या आघाडीच्‍या कंपनीने स्‍मार्ट इंटरनेटच्‍या लाँचची घोषणा केली आहे. या उद्योगक्षेत्रातील पहिल्‍या स्‍मार्ट इंटरनेट लीज-सिंगल सूटमध्‍ये हाय स्‍पीड इंटरनेटसह क्‍लाऊड आधारित सुरक्षितता व उत्तम नियंत्रणाचे संयोजन आहे, जे किफायतशीर दरामध्‍ये उपलब्‍ध आहे. वाढत्या फिशिंग, रॅन्‍समवेअर यांसारख्‍या सायबर हल्‍ल्‍यांचे वाढते प्रमाण आणि आधुनिकतेमुळे नेटवर्क व्‍यवस्‍थापन क्षमता व व्हि‍जिबिलिटी ही चिंतेची बाब ठरत आहे . यामुळे अनेक व्‍यवसायांच्‍या उत्‍पादनांवर विपरीत परिणाम होत असून आर्थिक, तसेच प्रतिष्‍ठाव स्थिरतेवर देखील परिणाम झालेला दिसत आहे . या सर्व आव्‍हानांचे स्‍मार्ट इंटरनेटच्या माध्यमातून निराकरण करण्‍यास मदत होते .

सिस्‍कोच्‍या उद्योग अहवालानुसार भारतातील ७४ टक्‍के एसएमबींना मागील एका वर्षामध्‍ये सायबर घटनांचा सामना करावा लागला आहे . त्‍यापैकी ८५ टक्‍के व्‍यवसायांनी ग्राहकांची माहिती धोकादायक वेबसाइट्सवर लिंक झाली आणि व्‍यवसायांना देखील मोठा फटका बसला. परिणामत: व्‍यवसायांचे झपाट्याने डिजिटायझेशन होत असताना ते सायबर-हल्‍ल्‍यांचे देखील सुलभपणे लक्ष्‍य बनत आहे .त्‍यांनी त्‍यांच्‍या डिजिटल पायाभूत सुविधेच्‍या संरक्षणासाठी विश्‍वसनीय सुरक्षितता सोल्‍यूशन्‍सकडे लक्ष देण्‍याची गरज आहे.

स्‍मार्टइंटरनेट सोल्‍यूशन्‍स च्या माध्यमातून उद्योजकांना ऑनलाइन धोक्‍यांपासून रिअल-टाइम संरक्षण मिळते · व्‍यवस्‍थापित सेवांसाठी वेब पोर्टल उपलब्‍ध होते तसेच ९९.५ टक्‍के सर्विस अपटाइम सुरक्षितता,असून समर्पित सममित बॅण्डविड्थ अल्‍ट्रा–फास्‍ट व विश्‍वसनीय कनेक्‍टीव्‍हीटी, व्हिजिबिलिटी व व्‍यवस्‍थापन क्षमता ही स्‍मार्टइंटरनेट सोल्‍यूशन्‍सची प्रमुख वैशिष्‍ट्ये आहेत. स्‍मार्ट इंटरनेट मालवेअर, बोटनेट्स, फिशिंग, रॅन्‍समवेअर, अॅडवेअर याविरोधात संरक्षण देते, तसेच कोणत्‍याही पोर्ट किंवा प्रोटोकॉलमधील कॉलबॅक्‍सवर नियंत्रण ठेवते. ज्‍यामधून प्रबळ डोमेन नेम सर्विस सुरक्षित राहते .

एकंसधी कनेक्‍टीव्‍हीटीसाठी नियंत्रण ग्राहकांना वेबसाइट्स व कन्‍टेन्‍ट विभाग ब्‍लॉक / अनब्‍लॉक करण्‍याची सुविधा देते. व्‍यवस्‍थापन क्षमता ग्राहकांना ब्‍लॉक केलेल इव्‍हेण्‍ट लॉग्‍स व थ्रेट्ससह त्‍यांचे डॅशबोर्ड पाहण्‍याची सुविधा देते, ज्‍यामुळेअद्वितीय मूल्‍यवर्धित आयएलएल लिंक व रिपोर्टसची निर्मिती होते. हे सर्व लाभ व्‍यवसायांनाअचानकपणे येणा-या किंवा येऊ शकणा-या सायबर हल्ल्यांपासून संरक्षणासाठी अधिक सुसंगतआणि विश्‍वासार्ह सुरक्षा देतात.

टाटा टेलि‍सर्विसेसचे उपाध्‍यक्ष श्री. मन्‍नू सिंग म्‍हणाले की संरक्षण, नियंत्रण व व्‍यवस्‍थापन क्षमता हे स्‍मार्टनेटवर्कसाठी आवश्‍यक मुलभूत घटक आहेत. स्‍मार्ट इंटरनेट व्यवसायांना , विशेषत: एसएमबींना सामना करावे लागणारे सायबर-हल्‍ले कमी करण्‍याच्या उद्देशाने आणि किफायतशीर दरामध्‍ये प्रगत सुरक्षिततेच्‍या खात्रीसह एकसंधी कनेक्‍टीव्‍हीटी देते. स्‍मार्ट इंटरनेटसह व्‍यवसाय त्‍यांची उत्‍पादन क्षमता वाढवण्‍यासाठी रिअल टाइम वापर नियंत्रण आणि व्‍यवस्‍थापनक्षमतेसह आमच्‍या उच्‍च-सुरक्षित व उच्‍च-कार्यक्षम नेटवर्कवरील बॅण्‍ड-विड्थ-हेवीअॅप्‍लीकेशन्‍स सुलभपणे प्राप्‍त करू शकतात. टीटीबीएस प्रभावी डिजिटल परिवर्तन क्षमता देण्‍याशी आणि व्‍यवसायांना त्‍यांच्‍या विकासाला चालना देण्‍यामध्‍ये मदत करण्‍याशी कटिबद्ध आहे.


Share this Newz