भारतातील सर्वात मोठा विद्यार्थी निवास ब्रॅण्‍ड मायफर्स्‍ट एक्‍सपीला पुण्‍यामधून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

‘मायफर्स्‍टएक्‍सपी’ हे भारताचे सर्वात प्रगत एआय-एमएल ने‍तृत्वित रोजगार हमी देणारे व्‍यासपीठ आहे, जे इंटर्नशिप्‍स किंवा रोजगाराचा शोध घेत असलेल्‍या व्‍यक्‍तींना जागा मिळण्‍याची खात्री देईल. झोलोच्‍या सहयोगाने लाँच करण्‍यात आलेला भारतातील विभाग अग्रणी आणि सर्वात मोठा को-लिव्हिंग व विद्यार्थी निवास ब्रॅण्‍ड मायफर्स्‍ट एक्‍सपी ला आज लाँच होताच पुण्‍यामधून उत्‍स्‍फूर्त सकारात्‍मक प्रतिसाद मिळाला आहे.

झोलो समुदायाने या व्‍यासपीठाची संकल्‍पना मांडली, जेथे नेतृत्‍व टीम व सर्व निवासींनी महामारीदरम्‍यान नोकरी गमावलेल्‍या व्‍यक्‍तींना दुसरी नोकरी शोधण्‍यामध्‍ये मदत केली. टीमला मिळालेली मोठी शिकवण म्‍हणजे नोकरीकरिता मुलाखत व पदानुसार ज्ञानासाठी शेवटपर्यंत तयारी केल्‍यास नोकरी मिळण्‍याच्‍या संभाव्‍यतेवर मोठा परिणाम होतो. तसेच मायफर्स्‍टएक्‍सपीचा विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातून व्‍यक्‍ती सामना करणा-या समस्‍यांचे निराकरण करण्‍याचा आणि कंपन्‍यांना त्‍यांची नियुक्‍ती करताना त्‍यांच्‍याकडून अपेक्षित असलेल्‍या कौशल्‍यांबाबत माहिती देण्‍याचा मनसुबा आहे.

या नवीन लाँचबाबत बोलताना मायफर्स्‍टएक्‍सपीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक डॉ. निखिल सिकरी म्‍हणाले, महामारीने आम्‍हाला व्‍यासपीठ निर्माण करण्‍यास प्रेरित केले आहे, जे योग्‍य नोकरी मिळण्‍यामध्‍ये विद्यार्थी व श्रमजीवी व्‍यावसायिकांसाठी शेवटच्‍या प्रयत्‍नांमधील पोकळी भरून काढणारे सोल्‍यूशन सादर करू शकेल. नोकरीसंदर्भात कमी संदर्भ व सुसंगतेमुळे अनेक लोकांना त्‍यांची स्‍वप्‍नवत नोकरी मिळत नाही. दुसरी नोकरी करण्‍याचा विचार करत असलेल्‍या लोकांना त्‍यापेक्षाही अधिक अवघड जाते. मायफर्स्‍टएक्‍सपीसह आम्‍ही आशा करतो की, लोकांचा प्रथम अनुभव नोकरीसाधकांसाठी, तसेच आमच्‍या व्‍यासपीठाच्‍या माध्‍यमातून त्‍यांना नियुक्‍त करणा-या कंपन्‍यांसाठी विन-विन स्थिती असेल.

मायफर्स्‍टएक्‍सपीचे सीओओ जवाहर साहूकारू म्‍हणाले, कंपनी रोजगाराची हमी देणारा उपक्रम एक्‍स्‍पीजॉब्‍स ऑफर करते, जो पहिल्‍यांदाच नोकरीची शोध घेणा-या किंवा नोकरी बदलण्‍याचा विचार करणा-या लोकांची कौशल्‍ये विकसित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

मायफर्स्‍टएक्‍सपीचे सीटीओ अमित दिक्षित म्‍हणाले, ”सर्वोत्तम निष्‍पत्तींच्‍या खात्रीसाठी मायफर्स्‍टएक्‍सपीने मशिन लर्निंग टेक्‍नोलॉजीचे पाठबळ असलेले भारताचे सर्वात अत्‍याधुनिक व्‍यासपीठ विकसित केले आहे, जे प्‍लेसमेंटपर्यंत स्क्रिनिंग, कोर्स प्रसार व मुलाखतींची सुविधा देते. व्‍यासपीठ कार्यसंचालने वाढवण्‍यासाठी आणि खर्च व वेळेमध्‍ये कार्यक्षमता संपादित करण्‍यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स व मशिन लर्निंग मॉडेल्‍सचा वापर करते. आणि युजर्ससाठी ते टचपॉइण्‍ट्सवर एकसंधी अनुभव देते.”

हा अनुभव प्रत्‍येक उमेदवाराला त्‍यांच्‍यामधील क्षमता व कमकुवत बाबींच्‍या डिस्‍कव्‍हरी सेशनमध्‍ये घेऊन जाईल. तसेच कोर्स प्‍लानिंग मार्गदर्शकांच्‍या मूल्‍यांकनानुसार सर्वांगीण विकास करणारा अभ्‍यासक्रम विकसित करतो. ट्रेनिंग सेशन्‍समध्‍ये त्‍यांना प्रत्‍यक्ष मेन्‍टॉरशीप सत्रांचा अनुभव मिळतो. लाँचपॅड त्‍यांना वास्‍तविक विश्‍वातील मुलाखती, व्‍यावसायिक रिझ्यूम्‍स, व्हिडिओ प्रोफाइल्‍ससाठी तयार करतो आणि लास्‍ट-माइन प्रीपरेशन मुलाखतीसाठी तयार करते. मायफर्स्‍टएक्‍सपीमध्‍ये ६०० हून अधिक कॉर्पोरेट्सचे ५००० हून अधिक रोजगार आहेत आणि दररोज २०००हून अधिक इच्‍छुकांची चाचपणी केली जाते


Share this Newz