द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
चिखलीतील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिखली परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी या शिबिर घेण्यात आले.
सोनवणे वस्ती परिसरातील पूजा मंगल कार्यालयात या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जनरल फिजिशियन तपासणी, अस्थिरोग तपासणी, लॅप्रोस्कोपीमध्ये पोटाचे आजार व उपचार, महिलांना प्रसूतिपूर्व सल्ला तसेच आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरासाठी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अशपाक बांगी, डॉ. उमेश जाधव, डॉ. दिग्विजय जाधव यांचे सहकार्य लाभले.
या शिबिराविषयी माहिती देताना जितेंद्र यादव यांनी सांगितले, की आमच्या मातोश्री अलकाताई यादव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे शिबिर चिखली परिसरात होणे अत्यंत गरजेचे होते. त्यानुसार तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले.
परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी आम्हीच जबाबदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी अल्पदरात आरोग्य तपासणी गरजेची होती. अनेक ज्येष्ठ नागरिकांना गुडघेदुखी, कंबरदुखी असे विविध त्रास आहेत. त्यावर उपचार व्हावेत, यादृष्टीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते, असेही जितेंद्र यादव म्हणाले.











Leave a Review