कचराकुंडीमुक्त रहाटणी, पिंपळे सौदागर आता प्लास्टिकमुक्त करणार : विठ्ठल उर्फ नाना काटे

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : ज्याप्रमाणे रहाटणी, पिपंळे सौदागर प्रभाग कचराकुंडीमुक्त केला, तसाच हा प्रभाग १०० टक्के प्लास्टिकमुक्त करणार, असे आश्वासन माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी दिले.

पिंपरी चिचंवड महापालिकेतर्फे प्लॅागोथॅान २०२१ ‘चला स्वच्छाग्रही बनूया’ या स्वच्छता मोहिमेंतर्गत आपले शहर स्वच्छ व सुदंर बनविण्यासाठी शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने आज पिंपळे सौदागर येथे आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे व माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य कर्मचारी, नागरिक यांना स्वच्छतेबाबत जनजागृती प्रतिज्ञा शप्पथ देण्यात आली. यावेळी ड प्रभाग प्रशासन अधिकारी उमाकांत गायकवाड, सहाय्यक आरोग्य अधिकारी शशिकांत मोरे, सॅनिटरी इन्स्पेक्टर राजू साबळे, आरोग्य सहायक निलेश कदम, सुहास सोनसळे, डॅा. प्रफुल्ल तपशाळकर, स्थापत्य विभागाचे सुनिलदत्त नरोटे, श्री. शिर्के, परिसरातील नागरिक, आरोग्य कर्मचारी व सोसायटीमधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share this Newz