द न्यूज बिज् टीम, पुणे
फ्लोबिझ या भारतातील एसएमबींसाठीच्या वेगाने वाढणाऱ्या निओबँकेने आज पद्मश्री विजेते अभिनेते मनोज बाजपेयी यांच्यासोबत झालेल्या सहयोगाची घोषणा केली. या बेंगळुरूस्थित फिनटेक कंपनीपुढे एसएमबी क्षेत्रापर्यंत वेगाने पोहोचण्याचे व आपले फ्लॅगशिप उत्पादन मायबिलबुक (myBillBook) प्रमोट करण्याचे उद्दिष्ट आहे. मायबिलबुक हे वापरण्यासाठी अत्यंत सोपे असे जीएसटी बिलिंग व अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे आणि मनोज बाजपेयी त्याचे ब्रॅण्ड अँबॅसडर आहेत.
प्रख्यात बॉलिवूड अभिनेते मनोज बाजपेयी या सहयोगाबद्दल म्हणाले, “आपण दररोज ज्या उत्पादन व सेवांचा उपभोग घेतो, त्यातील बहुतेक देशातील छोट्या व मध्यम व्यवसायांद्वारे दिल्या जातात. मात्र, डेडिकेटेड डिजिटल साधने किंवा वित्तीय सेवांचा विषय येतो, तेव्हा या एसएमबींचा फारसा विचार होत नाही असा पूर्वानुभव आहे. त्यामुळेच एसएमबींना आपल्या मायबिलबुक या उत्पादनाद्वारे तंत्रज्ञानात्मक सोल्युशन्स व क्युरेटेड सेवा पुरवून, त्यांच्या वाढीला वेग देण्याच्या, फ्लोबिझच्या उद्दिष्टामुळे मी व्यक्तीश: खूपच प्रभावित झालो. विशेषत: कोविड-१९ साथीनंतर डिजिटल स्तरावर काम करणे व्यवसायांसाठी अत्यंत आवश्यक झाले आहे आणि मायबिलबुक हे ही गरज पूर्ण करणाऱ्या सर्वांत अनुकूल उपयोजनांपैकी एक आहे.”
“जेव्हा फ्लोबिझची टीम माझ्याकडे ‘बिझनेस को ले सिरियसली’ या अभियानाची कल्पना घेऊन आली, तेव्हा मला लगेचच याबद्दल रस वाटू लागला. त्यांची कथानके विनोदी व मजेशीर होती, निर्मिती करणाऱ्या टीमचा लौकिक उत्तम होता आणि कंपनीचे उद्दिष्ट प्रामाणिक होते. त्यांचा ब्रॅण्ड प्रमोट करण्यासाठी त्यांच्याशी सहयोगाची संधी मिळाल्याबद्दल मला आनंद आहे,” ते म्हणाले.
“देशभरातील महत्त्वाकांक्षी व्यवसाय मालकांना लक्ष्यस्थानी ठेवणाऱ्या मायबिलबुक या उत्पादनासाठी एक विश्वासार्ह आणि आपलासा वाटणारा ब्रॅण्ड तयार करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणजे ‘बिझनेस को ले सिरियसली’ हे अभियान होय. आमचे उद्दिष्ट व उत्पादनाचे मूल्यविधान देशभरातील छोट्या व्यवसायमालकांपर्यंत पुढील वर्षभर पोहोचवत राहण्यासाठी श्री. मनोज बाजपेयी यांच्याशी सहयोग करणे आमच्यासाठी अत्यंत थरारक अनुभव होता.











Leave a Review